घरCORONA UPDATECoronaVirus: २४ तासांत ३८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

CoronaVirus: २४ तासांत ३८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून गेल्या २४ तासांत देशात ३८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून गेल्या २४ तासांत देशात ३८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. आज दिल्लीत झालेल्या आरोग्य मंत्रलयाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण कोरोनाबाधिकांची संख्या १७२५ झाली आहे.

- Advertisement -

३८ जणांचा मृत्यू तर १३२ रुग्ण झाले बरे 

दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या ९३ लोकांना कोरोना झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली असून पुढे ते म्हणाले की, कोरोना व्हायरसचे एकूण १६३७ केसेस आतापर्यंत आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत ३८६ नव्या केसेसची नोंद झाली असून ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १३२ रुग्ण हे बरे झाले आहेत. मात्र कालपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. तबलीगी जमातशी संबंधीत १८०० लोकांना हॉस्पिटलमध्ये तसेच क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. शिवाय रुग्णांसाठी रेल्वेमध्ये ३.२ लाख आयसोलेशन आणि क्वारंटाइन बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. ही व्यवस्थ एकूण ५ हजार रेल्वे कोचमध्ये केली जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘कोरोनाशी लढणाऱ्या ‘हिरोंचा’ मृत्यू ओढवल्यास कुटुंबियांना १ कोटींची मदत’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -