४ कामगारांना ट्रेननं चिरडले

सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी उत्तरप्रदेशमध्ये ४ जणांना ट्रेननं चिरडलं आहे. रेल्वेनं घटनेच्या चौकशीचे आदेध दिले आहेत.

Lucknow
Objecting To smoke, co - passenger attacked on pregnant woman
प्रातिनिधिक फोटो

ट्रॅकमन, गँगमनच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण, उत्तरप्रदेशातील हरदाई येथे चार कामगारांना ट्रेननं चिरडलं आहे. ट्रॅकचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. आज ( सोमवारी ) झालेल्या या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी हा दुर्घटना झाली. कोलकाता – अमृतसर अकाल तख्त एक्सप्रेसनं ४ गँगमनला चिरडलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. कोणत्याही नियोजनाशिवाय ट्रॅकच्या दुरूतीचं काम सुरू होतं. त्यामुळे भरधाव वेगानं येणाऱ्या लोकोपायलटला याबद्दल कोणताही अंदाज आला नाही. दरम्यान, या दुर्घटनेची दखल रेल्वेनं घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी पंजाबमध्ये देखील दसऱ्या निमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ७० जणांना रेल्वेनं चिरडलं होतं.

वाचा – पंजाबमध्ये भयानक दुर्घटना; रेल्वेने ६० पेक्षा अधिक नागरिकांना चिरडले

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here