धक्कदायक! १२ तासात कोरोनाचे ४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

१२ तासात कोरोनाचे ४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता भीतीचे वातावरण पसरले आहे.

Andhra Pradesh
43 new positive covid 19 cases detected in andhra pradesh since last 12 hours
धक्कदायक! १२ तासात कोरोनाचे ४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात एकाच दिवशी ८२ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईत ५९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३०२ झाली आहे. तर धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे अवघ्या १२ तासामध्ये तब्बल ४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण आंध्र प्रदेशमध्ये आढळून आले असून ३१ मार्च रोजी ९ वाजेपर्यंत ४४ रुग्ण होते. तर १ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता ही आकडेवारी ८७ वर जाऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत माहिती देताना, असे स्पष्ट करण्यात आले आहे की, हे सर्व ४३ रुग्ण दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलीगी जमातमध्ये सहभागी झाले होते आणि तेथूनच ते परतले होते.

जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

आंध्र प्रदेश सरकारने सांगितले की, ‘मंगळवारी कडप्पा जिल्ह्यात सर्वाधिक १५ रुग्ण आढळून आले आहेत. तर पश्चिम गोदावरीमध्ये १३ आणि गुंटूरमध्ये ९ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच चित्तोडमध्ये ५, प्रकाशममध्ये ४, पूर्व गोदावरी २, नेल्लोरमध्ये २ आणि कृष्णा आणि विशाखापट्टणममध्ये १ – १ रुग्ण आढळून आले आहेत.

याठिकाणचे रुग्ण झाले बरे

नेल्लोर आणि विशाखापट्टणममधील एक – एक रुग्ण हे बरे झाले आहेत. मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून ३७३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आणि बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ३३० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर ४३ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दिल्लीत ३६ तास मोहीम

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, ‘निजामुद्दीनमधील तबलीगी जमातचे मरकज पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. सुमारे ३६ तासात तिथून २ हजार ३६१ लोकांना हलविण्यात आले आहे. त्यापैकी ६१७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित इतरांना क्वॉरंटाइन करण्यात आले’, असल्याची माहिती सिसोदिया यांनी ट्विटद्वारे दिली आहे.


हेही वाचा – ‘कोरोनाशी लढणाऱ्या ‘हिरोंचा’ मृत्यू ओढवल्यास कुटुंबियांना १ कोटींची मदत’