घरदेश-विदेशनेपाळमध्ये पावसाचा हाहाकार! ४३ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार! ४३ जणांचा मृत्यू

Subscribe

मुसळधार पावसाने नेपाळचा चेहरामोहरा बदलला आहे. या पावसामुळे आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेपाळमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यासह सुरु असणाऱ्या पावसाने नेपाळचा चेहराच बदलून टाकला आहे. बऱ्याच नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे गावांमध्ये पाणी भरले आहे. या मुसळधार पावसांत आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पुर आल्यामुळे काही भागांमध्ये दरळ कोसळली आहे. याशिवाय अजूनही २४ जण बेपत्ता असून २० जखमी झाले आहेत. दरम्यान, नेपाळचे सुरक्षा दल नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पूरग्रस्त भागात अन्न आणि जीवनाश्मक गोष्टी पुरवल्या जात असल्याची माहिती नेपाळ अपात्काली व्यापस्थापनाचे प्रमुख बेदव निधी यांनी दिली आहे. याशिवाय पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.

नेपाळची राजधानी काठमांडूचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. पुरामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. पावसामुळे काही ठिकाणी घरे देखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकांना या भागातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – तुमच्या बँकांना विचारा आणि मग चोर कोण ते ठरवा – विजय मल्ल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -