घरCORONA UPDATECoronaVirus: देशातील सर्वात लहान रुग्ण; ४५ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण

CoronaVirus: देशातील सर्वात लहान रुग्ण; ४५ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण

Subscribe

दिल्लीतील खासगी हॉस्पिटलमध्ये देशातील सर्वात लहानग्या कोरोनाबाधितावर उपचार सुरू आहेत. अवघ्या ४५ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

दिल्लीतील खासगी हॉस्पिटलमध्ये देशातील सर्वात लहानग्या कोरोनाबाधितावर उपचार सुरू आहेत. अवघ्या ४५ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बाळाला १४ एप्रिल रोजी दिल्लीतील कलावती सरण चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून १६ एप्रिल रोजी त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – Coronavirus Maharashtra: राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ४ हजार पार

- Advertisement -

सर्व वयोगटातील रुग्ण

देशात सर्व वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ठराविक एका वयोगटाला या विषाणूचा धोका आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात १५ हजार ७१२ कोरोनाबाधित आहेत. तर मृतांचा आकडा हा ५०७ वर पोहोचला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला उद्देशून आणखी एक महत्त्वाचा संदेश दिला असून त्यामध्ये त्यांनी कोविड-१९ हा हल्ला करण्यापूर्वी कोणताही जात-पात, धर्म, वंश, रंग, पंथ, भाषा किंवा सीमा बघणार नाही. त्यामुळे आपले आचरण आणि प्रतिसाद हे ऐक्य तसेच बंधुता यांना प्राधान्य देणारे हवे, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशातील नागरिकांना हा संदेश दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -