घरदेश-विदेशएअर स्ट्राईक करणार्‍या अभिनंदनसह पाच वैमानिक वीरांना शौर्य पुरस्कार

एअर स्ट्राईक करणार्‍या अभिनंदनसह पाच वैमानिक वीरांना शौर्य पुरस्कार

Subscribe

पाकिस्तानातील बालाकोट येथे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षिण शिबिरांवर बॉम्बफेक करणारे भारतीय हवाई दलाच्या पाच वैमानिक वीरांना शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणारआहे. तर पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडणारे स्कॉड्रन लिडर अभिनंदन वर्थमान यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. गुरुवारी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी या वीरांना सन्मानित करण्यात येणार आहे.

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसर्‍याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचे एफ 16 हे विमान पाडले होते. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग 21 हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते. अभिनंदन यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

तसेच बालाकोटला दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर एअर स्ट्राईक करणारे भारतीय हवाई दलाचे वीर विंग कमांडर अमित रंजन, स्क्वॅार्डन लीडर राहुल बसोया, पंकज भुजडे, बीकेएन रेड्डी, शशांक सिंह यांचा शौर्य पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या वीरांनी मिराज-२००० या लढाऊ विमानातून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता. भारतीय वायू दलातील वरिष्ठ अधिकारी (स्वाडूट लिडर) मिंटी अग्रवाल यांनाही युद्ध सेवा मेडल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेना पदक
उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी लढताना वीरमरण आलेले कोकणाचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेना पदक जाहीर करण्यात आले आहे. मेजर कौस्तुक राणे हे काश्मीरमध्ये ड्युटीवर असताना गुरेज सेक्टरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती त्यांना मिळाली. राणे यांनी पथकाचे नेतृत्त्व करताना अतिरेक्यांना कंठस्नान घातले. मात्र त्यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर सेना पदक देण्यात येणार आहे. मेजर राणे नियंत्रण रेषेलगत केलेल्या कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -