घरदेश-विदेशन्यूझिलंड मशिदीत झालेल्या गोळीबारात पाच भारतीयांचा मृत्यू

न्यूझिलंड मशिदीत झालेल्या गोळीबारात पाच भारतीयांचा मृत्यू

Subscribe

न्यूझीलंडच्या दक्षिण आयलंड शहरातील मशिदीमध्ये झालेल्या गोळीबारात पाच भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारामध्ये ५० मृत्यू झाला होता. यामध्ये ५ भारतीयांंचा समावेश असल्याची माहिती ट्विटरवरून समोर आली आहे. मृतपावणाऱ्या भारतींचा आकडा वाढून ७ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या मृतांमध्ये एकजण हैद्रबाद तर दोघे जण गुजरात आणि एक व्यक्ती तेलंगणातील असल्याचे समजले आहे. या हल्ल्यात पाकिस्तान आणि बांग्लादेशमधील दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महेबूब खोखर, रमीझ वोरा, असिफ वोरा, अंसी अलीबावा, ओझेर काडी अशी या मृतांची नावे आहेत. न्यूझीलंडमधील मशिदीत अंदााधुंद गोळीबाराच्या दोन दिवसांनंतर उच्चायुक्ताने पाच भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

काय आहे घटना

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये अज्ञाताने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. या गोळीबारात आता पर्यंत ५० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले. या जखमींमध्ये एका भारतीयांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -