घरदेश-विदेशहरियाणामध्ये भरधाव कारने मजूरांना चिरडले; ५ जणांचा मृत्यू

हरियाणामध्ये भरधाव कारने मजूरांना चिरडले; ५ जणांचा मृत्यू

Subscribe

हरियाणा कार अपघातामध्ये ५ मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर ९ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. कारचालकाचे गाडीवरील ताबा सुटल्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती घटनास्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

हरियाणामध्ये भीषण अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. हरियाणाच्या हिसारमध्ये ही घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने रस्त्याच्याकडेला झोपलेल्या मजदूरांना चिरडले आहे. अपघातामध्ये ५ मजूरांचा मृत्यू झाला तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हरियाणाच्या हिसारमध्ये एका पुलावर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. रस्त्याचे काम करणारे मजूर रात्री काम झाल्यानंतर पुलावरच झोपले. दरम्यान भरधाव वेगात आलेल्या एका कारने या मजूरांना चिरडले. या अपघातामध्ये ५ मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर ९ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. कारचालकाचे गाडीवरील ताबा सुटल्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती घटनास्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

- Advertisement -

जखमींवर उपचार सुरु

हरियाणा पोलीस अधिकारी हरीश भारद्वार यांनी सांगितले की, या अपघाताचा तपास सुरु आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मजूराची ओळख भूषण, शंकर, गोवरधन, विकास, सतन कुमार अशी सांगितली जात आहे. अपघातातील मृतांच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

असे सांगितले जात आहे की, हिसारमध्ये एका पुलाचे काम सुरु होते. बुधावारी सकाळी दोन वाजता भरधाव वेगात आलेल्या कारने सर्व मजूरांना चिरडले. त्यानंतर या कारने पुलावर असलेल्या इतर गाड्यांना धडक दिली. त्यानंतर ही कार पुलाच्या खाली कोसळली. या अपघातामध्ये कारचालक गंभीर जखमी झाला आहे. तर ५ मजूरांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. पोलिसांकडून तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -