घरदेश-विदेश५ कोटी फेसबुक युजर्सची खाती हॅक

५ कोटी फेसबुक युजर्सची खाती हॅक

Subscribe

फेसबुकची एकूण ५ कोटी खाती हॅक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये भारतीय फेसबुक युजर्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरा बरोबरच त्याचा गैरवापर देखील तितकाच केला जात आहे. व्हॉट्सअॅप,फेसबुक आणि इन्स्ट्राग्राम यावर रोज हजारो युजर्स जोडले जात आहेत. मात्र या युजर्सची खाती सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. फेसबुकवर हॅकर्सने हल्ला केला असून फेसबुकची एकूण ५ कोटी खाती हॅक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये भारतीय फेसबुक युजर्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. फेसबुकच्या View as या फेसबुक फिचर सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा गैरफायदा घेत हॅकर्सने फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मात्र हॅक झालेली पाच कोटी खाती नेमकी कोणत्या देशातील आहेत. हे मात्र अद्याप उघड झालेले नाही.

फेसबुकचे २ अब्जाहून अधिक युसर्स

जगभरात फेसबुकचे २ अब्जाहून अधिक युसर्स असल्याचे समोर आले आहे. तर यात सर्वाधिक २७ कोटी युजर्स हे भारतात आहेत. त्यामुळे हॅक करण्यात आलेल्या अकाऊंटमध्ये भारतीय युजर्सचा मोठा वाटा असल्याच बोल जात आहे.

- Advertisement -

५ कोटी अकाऊंटमध्ये हॅकर्सचा शिरकाव

फेसबुकने वर्षापूर्वी View as हे फिचर सुरु केलं होतं. मात्र हे फेसबुकचं View as फिचर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. या फिचरच्या सुरक्षेमध्ये असलेले दोष हेरुन हॅकर्सने ५ कोटी अकाऊंटमध्ये प्रवेश केल्याचं फेसबुकच्या निदर्शनास आले आहे. फेसबुकला हे कळताच फेसबुकने तत्काळ उपाययोजन केल्या. त्यामुळे हॅकर्सकडून युजर्सच्या अकाऊंटचा गैरवापर झाला आहे की नाही हे मात्र अद्याप कळलेले नाही. मात्र हॅकर्सकडून ५ कोटी खाती हॅक केली गेली आहे ही समस्या अतिशय गंभीर असल्याचे देखील फेसबुककडून सांगण्यात येत आहे.

वाचा – फेसबुकमध्ये 20 हजार नोकऱ्यांची बंपर वॅकन्सी; पगार चार लाख

- Advertisement -

वाचा – फेसबुकवरील कमेंट पडली महागात

वाचा – ‘फेसबुक’वरील गर्लफ्रेंडने घातला ३५ लाखाचा गंडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -