घरदेश-विदेशएअर इंडियातून प्रवास करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सूट

एअर इंडियातून प्रवास करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सूट

Subscribe

ही सवलत देशातील कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्यावर, तिकीट प्रवासाच्या आधी किमान 7 दिवस घेऊ शकणार

एअर इंडियाने विमान प्रवास करणार्‍या ज्येष्ठ प्रवाशांना मोठी सूट दिली आहे. इकॉनॉमी केबिनमध्ये निवडक बुकिंगसाठी बेसिक किमतीच्या 50 टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत देशातील कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्यावर असणार आहे. याचं तिकीट प्रवासाच्या आधी किमान 7 दिवस घेऊ शकणार आहे. याची वैधता 1 वर्षांपर्यंत असणार आहे.

एअर इंडियाच्या या बम्पर ऑफरचा फायदा केवळ भारतीय नागरिकांना घेता येणार आहे. भारतात राहणार्‍या आणि भारतीय नागरिक असलेल्या ज्येष्ठांनाच ही 50 टक्क्यांची सवलत मिळेल. यासाठी प्रवाशाचे वय वर्षे 60 पेक्षा अधिक असणे आवश्यक असणार आहे. ज्या लोकांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असणार नाही त्यांना एअर इंडियाच्या या योजनेचा फायदा घेता येणार नाही.

- Advertisement -

तिकीट बुकिंग करताना सूट मिळवण्यासाठी प्रवाशाकडे एक मान्यताप्राप्त फोटो ओळखपत्र असणे बंधनकारक असणार आहे. या ओळखपत्रात जन्मतारीख लिहिलेली असणे गरजेचे आहे. यात मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एअर इंडियाकडून वरिष्ठ नागरिकांना दिले जाणारे ओळखपत्र अशा कागदपत्राचा समावेश आहे. यावरून संबंधित प्रवाशाच्या वयाची तपासणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -