घरताज्या घडामोडीभूमाफियांनी महिलेला शेतात जिवंत जाळले, घटना कॅमेरात कैद!

भूमाफियांनी महिलेला शेतात जिवंत जाळले, घटना कॅमेरात कैद!

Subscribe

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा भूमाफियांचा ग्रुप ट्रॅक्टरचा वापर करून जमीन नांगरण्याचा प्रयत्न करीत असल्याच दिसत आहे.

आसाममध्ये एका महिलेला माफियांनी जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या भुमाफियांनी महिलेला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी या घटनेचा व्हिडिओ काढला होता. सालेहा बेगम असं या पीडितेच नाव आहे. पोलिसांनी त्या महिलेला वाचवत तीला एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

पीडितेने दिलेल्या पोलीस जबाबात म्हटले आहे की, मी माझ्या शेतात होते. यावेळी एका गटाने मला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. पण मी जखमी झाल्यांनतर सगळेच पळून गेले. ही घटना गुरुवारी मध्य आसाम जिल्ह्यातील मुरझार पोलिस स्टेशन अंतर्गत दक्षिण समराली भागात घडली. तेथे भूमाफिया गट जमीनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा महिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या ग्रुपला थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी महिलेला आग लावून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा भूमाफियांचा ग्रुप ट्रॅक्टरचा वापर करून जमीन नांगरण्याचा प्रयत्न करीत असल्याच दिसत आहे. आणि त्यांना महिला आणि तीचे कुटुंब त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेची सुटका केली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनेसंदर्भात पोलिसांनी मुरझार पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहेत.

“या घटनेसंदर्भात दिलेल्या तक्रारीनंतर आम्ही दोन गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये रहिमुद्दीन नावाच्या व्यक्तीविरूद्ध जमीन ताब्यात घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो आता फरार झाला आहे. ” अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

हे ही वाचा – भयंकर! कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्कारास गाव झालं गोळा आणि…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -