घरदेश-विदेशअश्लील वर्तन करणाऱ्या पोलीसाला घडली चांगलीच अद्दल

अश्लील वर्तन करणाऱ्या पोलीसाला घडली चांगलीच अद्दल

Subscribe

१० वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील वर्तन केल्या प्रकरणी एक निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या शाळेबाहेर अश्लील वर्तन करतांना काही तरुणांनी या अधिकाऱ्याला चोपला.

पोलीस दल हे लोकांच्या सरक्षणासाठी असते मात्र पोलिस लोकांवर अत्याचार करत असल्याचे काही प्रकार उघडकीस येत असते. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाचे नाव खराब होते. असाच प्रकार चेन्नई येथे घडला आहे. चेन्नई पोलीस दलात काम कर्यरत असलेल्या एका ५७ वर्षीय निवृत्त विशेष पोलीस उपनिरिक्षकाने १० वर्षिय मुलीशी अश्लील वर्तन केले. मागील काही दिवसांपासून हा या मुलीवर अत्याचार करत होता. पोलिशी खाक्या दाखवून लोकांना घाबरवत असल्याने लोकांनीही याची तक्रार केली नाही. मात्र अखेर रागाचा उद्रेख होऊन एका तरुणाने या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला चांगालाच धडा शिकवला.

काय आहे संपूर्ण घटना

के. वासू असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी हा चेन्नई पोलीस दलातून निवृत्त झालेला. पोलीस दलात कार्यरत असतानाही वासूने एका महिलेशी अश्लील वर्तन केले होते. या प्रकरणी त्याला काही वेळेसाठी निवृत्त करण्यात आले होते. के वासू व्हिलिवाकम परिसरात असलेल्या एका सरकारी शाळेबाहेर उभा राहून मुलींची छेड काढत होता. पीडित १० वर्षीय मुलगी याच शाळेतील विद्यार्थीनी आहे. पीडित मुलीसोबत अनेकदा वासून अश्लील वर्तन केले. पीडित मुलीने आपल्या पालकांनाही याची तक्रार केली मात्र पोलिसांच्या भितीमुळे त्यांनीही कोणते पाऊल उचलले नाही.

- Advertisement -

तरुणांनी घडवली अद्दल

अशाच एका संध्याकाळी वासू या ठिकाणी मुलीची छेड काढत होता. त्यावेळी येथे असलेल्या काही तरुणांनी ते बघितले. सुरुवातीला वासू हा पीडित मुलीचे वडिल असल्याचे त्यांना वाटले. मात्र वासूच्या अश्लील चाळ्या वरून त्यांनी वासूला चोप देण्यास सुरुवात केली. वासू आपली गाडी घटनास्थळी थेवूनच पळत सुटला. काही अंतरावर या तरुणांनी वासूला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पाक्सो गुन्हा पोलिसांनी वासू विरोधात नोंदवला आहे. तरुणांनी केलेल्या या धाडसामुळे पालकांमध्येही धैय आले आणि त्यांनी अखेर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

“वासू विरोधात गुन्हा दाखळ करण्यात आला आहे. हा प्रकार गंभीर असून त्यावर तात्काळ पाऊले उचलने आवश्यक आहे. वासू विरोधात पाक्सो अतंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयासमोर उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे.” – सी. कलासिल्वेन, पोलिस उपायुक्त माधवराम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -