घरदेश-विदेशछत्तीसगडच्या भिलाई स्टील प्लँटमध्ये स्फोट; ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

छत्तीसगडच्या भिलाई स्टील प्लँटमध्ये स्फोट; ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Subscribe

छत्तीसगडच्या भिलाई स्टील प्लँटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी झाले आहेत. गॅसच्या पाईप लाईनमध्ये हा स्फोट झाला असून स्फोटाचे कारण अस्पष्ट आहे.

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये असणाऱ्या भिलाई स्टील कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. मंगळवारी सकाळी कंपनीमध्ये गॅस पाईपलाईनमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर १४ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरु आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

गॅस पाईपलाईनमध्ये स्फोट

मंगळवारी सकाळी झालेल्या या स्फोटानंतर पोलीस आणि बचाव दलाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. या स्फोटामध्ये जखमी झालेल्या १४ जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भिलाई स्टील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीमध्ये कोक ओवनच्याजवळ कर्माचारी काम करत होते. त्याच दरम्यान अचानक पाईप लाईनचा स्फोट झाला. या स्फोटात ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -