घरदेश-विदेशकोलंबो एअरपोर्टवर पाईपमध्ये बॉम्ब सापडल्याने पुन्हा खळबळ

कोलंबो एअरपोर्टवर पाईपमध्ये बॉम्ब सापडल्याने पुन्हा खळबळ

Subscribe

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली होती. ही शोधमोहिम सुरु असताना विमानतळाजवळ स्फोटकांनी भरलेला पाईप सापडला. त्यामुळे पुन्हा एकच खळबळ उडाली.

रविवारी साखळी बॉम्बस्फोटाने हादरलेल्या श्रीलंकेमध्ये पुन्हा एका ठिकाणी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. श्रीलंकेच्या कोलंबो एअरपोर्टवर पाईपमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. श्रीलंका एअरफोर्टने सुदैवाने या बॉम्बला सुरक्षित पध्दतीने निष्क्रिय केला आहे. पुन्हा बॉम्ब सापडल्यामुळे कोलंबो एअरपोर्टवरील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण होते. या घटनेमुळे एअरपोर्टवर येणाऱ्या आणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. पुन्हा बॉम्बसापडल्यामुळे एअरपोर्टवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचसोबत कोलंबो एअरपोर्टवर विमान कंपन्यांनी प्रवाशांची कसून तपासणी सुरु केली आहे. त्यासाठी प्रवाशांना प्लाईटच्या ४ तास आधीच दाखल होण्यास सांगितेल आहे.

- Advertisement -

एअरफोर्सला बॉम्ब निष्क्रिय करण्यात यश

कोलंबो एअरपोर्टच्या परिसरामध्ये सहा फूटी पाईपमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली होती. ही शोधमोहिम सुरु असताना विमानतळाजवळ स्फोटकांनी भरलेला पाईप सापडला. त्यामुळे पुन्हा एकच खळबळ उडाली. पोलिसांनी विमानतळावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करत श्रीलंकन एअरफोर्सने हा बॉम्ब निष्क्रीय केला. त्यामुळे सुदैवाने कोणताही अनुच्चित प्रकार घडला नाही. एअरफोर्सचे प्रवक्ते गिहान सेनेविरत्ने यांनी सांगितले की आयईडी बॉम्ब स्थानिक स्तरावर बनविण्यात आले होते. पाईपमध्ये ठेवलेले बॉम्ब निष्क्रीय करण्यात एअरफोर्सला यश आले आहे.

आतापर्यंत २९० जणांचा मृत्यू

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरला आहे. रविवारी इस्टर संडेला श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ८ साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत २९० जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी १३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने नाही.

- Advertisement -

१३ संशयितांना अटक

श्रीलंकेत ८ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आतापर्यंत १३ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीलंका सरकारने सांगितले की, यामधील जास्त बॉम्बस्फोट हे आत्मघाती होता. मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानींसह एकूण ३५ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटात ३ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही केरळचे राहणारे आहेत.

हेही वाचा – 

श्रीलंका बॉम्बस्फोट: ‘तोहिथ जमात’ संघटनेवर संशय, भारतात ‘या’ ठिकाणी सक्रीय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -