घरदेश-विदेशH5N1 विषाणूच्या संक्रमणामुळे ६ मोरांचा मृत्यू

H5N1 विषाणूच्या संक्रमणामुळे ६ मोरांचा मृत्यू

Subscribe

पटना येथील संजय गांधी जैविक उद्यानात विषाणूमुळे सहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे उद्यान काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

पटना येथील प्राणी संग्रहालयात विषाणूचा प्रसार झाल्यामुळे प्राण्यांचा मृत्यू होत असल्याची घटनासमोर आली आहे. H5N1 (बर्ड फ्लू) हा विषाणू संग्रहलयात पसल्याने प्राण्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत सहा मोरांचा मृत्यू झाला आहे. पटना येथील संजय गांधी जैविक उद्यानात हा प्रकार घडला आहे. हे विषाणू कुठून आले याबद्दल अद्याप काही माहिती मिळाली नाही. संग्रहालय काही दिवसांसाठी बंद ठेवण्या निर्णय संग्रहालय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान उद्यानातील मृत प्राण्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. मात्र हे विषाणू अजून पसरूनये याची काळजी घेतली जात आहे. १८ डिसेंबर रोजी एका मोराचा मृत्यू झाला होता. यानंतर दर दिवसाआड मोरांचा मृत्यू होत असल्याने काळजी म्हणून प्राण्यांना वेगवेगळे ठेवण्यात येत आहे.

कोलकातातील प्रयोगशाळेत तपास

प्राण्यांच्या मृत्यूनंतर विषाणूचे परिक्षण करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले होते. डॉक्टरांनी बर्ड फ्लूचा अंदाज वर्तवला होता. या मोरांच्या मृतदेहाला कोलकाता येथील प्रयोग शाळेत नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी नंतर या विषाणूचे निदान झाले. या बद्दल अधिकृत रिपोर्ट सोमावारी संग्रहालयाला देण्यात आला.

- Advertisement -

बिहारमध्येही आढळलेले विषाणू

बिहार येथील मुंगरे  जिल्ह्यातही यापूर्वी हा विषाणू आढळला होता. मुंगरे जिल्ह्यातील असरगंज प्रखंड या गावात या विषाणूमुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला. या जनावरांची तपासणी केल्यानंतर बर्डफ्लूने यांचा मृत्यू झाला.

“बर्ड फ्लूमुळे प्राणी संग्रहालयात सहा मोरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संग्रहालयात येणाऱ्या लोकांवरही काही दिवस बंदी घालण्यात आली आहे. लवकरच यावर नियंत्रण मिळवण्यात येणार.” – मुख्य वन सरक्षक, डी. के. शुक्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -