सरसंघचालकांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडवले; सरपंचाच्या नातवाचा मृत्यू

राजस्थानातील तिजारामधून सरसंघचालक मोहन भागवत परतत असताना हरसोली-मुंडावर रस्त्यावर हा अपघात झाला.

Jaipur
Mohan_Bhagwat
सरसंघचालक मोहन भागवत

रा.स्व.संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या ताफ्यातील एका कारने रस्त्यावरील दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात स्थानिक सरपंचाच्या ६ वर्षीय नातवाचा मृत्यू झाला आहे. राजस्थानातील तिजारामधून सरसंघचालक परतत असताना हरसोली-मुंडावर रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या सरपंचावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीसाठी सरसंघचालक जयपूरला आले होते.

हेही वाचा – Breaking – मुंबईत जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग

जखमी सरपंचावर हॉस्पिटलमध्ये उपचार

सरसंघचालक मोहन भागवत हे राजस्थानातील तिजारामधून परतत होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील एका कारने येथील स्थानिक सरपंच चेत्राम यादव यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात चेत्राम यादव गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पण या अपघातात चेत्राम यादव यांचा ६ वर्षीय नातू सचिनचा मृत्यू झाला. संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीसाठी सरसंघचालक भागवत राजस्थानला आले होते. या बैठकीला संघाशी संबंधित ३५ संघटनांचे २०० पेक्षा अधिक प्रतिनिधी हजर होते.