घरट्रेंडिंगVideo: सहा वर्षाच्या मुलाचे सिक्स पॅक अॅब; बघा अशी घेतोय मेहनत

Video: सहा वर्षाच्या मुलाचे सिक्स पॅक अॅब; बघा अशी घेतोय मेहनत

Subscribe

लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक नागरिक हे सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे सोशल मीडियावर काय ट्रेंडिग आहे. कोणते नवे व्हिडिओ आणि फोटो आले आहेत, याचीही माहिती होते. शिवाय ते मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील केले जाते. सध्या तेहरानच्या सहा वर्षीय आरतचे सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. अवघ्या ६ वर्षाच्या आरत होसैनी यांने व्यायामाच्या आधारावर या वयात सिक्स पॅक अॅब बनवले आहेत. मोठमोठ्या अभिनेत्यांना सिक्स पॅक अॅब बनवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. कित्येक तास जिममध्ये व्यायामासाठी घालवावे लागतात. मात्र या मुलाने इतक्या कमी वयात सिक्स पॅक अॅब बनवून सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

View this post on Instagram

Hello ronaldo @cristiano ?? Best Football ?

A post shared by Arat Hosseini (@arat.gym) on

- Advertisement -

जिम्नॅस्ट, सॉकर खेळाडू आरत 

आरत हा एक इंस्टाग्राम स्टार असून तो सॉकर खेळाडू आहे. तसेच उत्तम जिम्नॅस्टही आहे. त्याच्या लांब केसांमुळे अनेकांदा तो मुलगी वाटतो. इराणमधील बाबोल शहरात राहणाऱ्या आरतने सिक्स पॅक अॅब आणि सॉकर या खेळामुळे सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवली आहे. परंतू आता त्याला फुटबॉलचे वेड लागले असून प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू मेस्सी सारखे बनायचे आहे. आरत यांचे वडिल मोहम्मद यांनी त्याच्या फिजिकल फिटनेसवर विशेष लक्ष दिले आहे. खुप कमी वयापासून आरत फिजिकल ट्रेनिंग घेत आहे. अवघ्या ९ व्या महिन्यापासून जिम्नॅस्टिक करण्यास त्याने सुरूवात केली. तर दोन वर्षाचा असताना जागतिक स्तरावर आपल्यातील विशेष कौशल्यामुळे मीडियामध्ये स्वतःची ओळख त्याने बनवली. इंस्टाग्रामवर आरतचे ४ मिनिअन फॉलोअर्स आहेत. त्याच्या एकेका पोस्टला मिलिअन इतके लाइक्स येतात. आरतचा जन्मा इंग्लंडच्या लिव्हरपूल येथे झाला असून सध्या तो लिव्हरपूल अकॅडमीमध्ये स्पोर्टस ट्रेनिंग घेत आहे.

हेही वाचा –

कोरोना योद्धा डॉक्टरला बेडसाठी १० तासांची प्रतिक्षा; डॉक्टर भावे यांचा मृत्यू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -