घरCORONA UPDATECorona Update: देशात २४ तासांत ६१,५३७ नव्या रुग्णांची वाढ, ९३३ जणांचा मृत्यू!

Corona Update: देशात २४ तासांत ६१,५३७ नव्या रुग्णांची वाढ, ९३३ जणांचा मृत्यू!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत ६१ हजार ५३७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ९३३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ८८ हजार ६१२वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ४२ हजार ५१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १४ लाख २७ हजार ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ६ लाख १९ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

तसेच देशात मागील काही दिवसांपासून कोरोना चाचण्या देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. ७ ऑगस्टपर्यंत देशात २ कोटी ३३ लाख ८७ हजार १७१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून यापैकी शुक्रवारी ५ लाख ९८ हजार ७७८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR – Indian Council of Medical Research) दिली आहे.

- Advertisement -

देशात सर्वाधिक कोरोनाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्या ५ लाखांच्या उंबरठ्यावर आहे. देशात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यात २ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच सर्वाधिक कोरोनाचे बळी हे महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यात पडले आहेत.


हेही वाचा – परराज्यातून येणार्‍यांना १४ दिवस होम क्वारंटाईन सक्तीचे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -