घरदेश-विदेशदिल्लीत सिलिंग फॅनच्या कंपनीत स्फोट; ७ जणांचा मृत्यू

दिल्लीत सिलिंग फॅनच्या कंपनीत स्फोट; ७ जणांचा मृत्यू

Subscribe

कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्याची तीन मजली इमारत कोसळली.

दिल्लीतील मोतीनगरमध्ये गुरुवारी रात्री एका कंपनीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सुदर्शन पार्क परिसरातील सिलिंक फॅन बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीची तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये ७ कामगारांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत. या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. स्फोटाची घटना कळताच अग्निशमन दलाने आणि एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. सकाळपर्यंत ढिगारा हटवण्याचे काम सुरु होते. स्फोट झाला त्यावेळी ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र बचावकार्य करत ८ जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य पूर्ण झाले असल्याची माहिती एनडीआरएफच्या टीमने दिली आहे. दरम्यान याच परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी अवैध कंपनींना सील करण्यात आले होते. या कंपनीच्या आसपासच्या काही इमारतींना सील करण्यात आले होते. तरी देखील ही कंपनी चालवली जात होती.

- Advertisement -

७ कामगारांचा मृत्यू 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पावने नऊच्या सुमारास सुदर्शन पार्कमध्ये असणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. या कंपनीमध्ये सिलिंक फॅन बनवले जायचे. कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्याची तीन मजली इमारत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या, पोलीस आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली. छत कोसळल्यामुळे या घटनेमध्ये ७ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर ढिगाऱ्याखाली दबलेल्या ८ जणांना बाहेर काढण्यात आले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आगीमध्ये सिलिंग फॅन बनवणारी कंपनी जळून खाक झाली आहे.

- Advertisement -

पोलीस तपास सुरु 

हा स्फोट ऐवढा भीषण होता की, स्फोटानंतर इमारतीचे दोन मजले कोसळले. स्फोटानंतर इमारतीचा मलबा शेजारच्या मोकळ्या जागेवर जाऊन पडला. त्याठिकाणी काही लोकं झोपली होते. ते लोकं देखील या मलब्याखाली दबले गेले. या स्फोटामुळे आसपासच्या इमारती आणि घरांचे नुकसान झाले. स्फोटानंतर काही काळ परिसरामध्ये धुराचे लोट पसरले होते. या घटनेचा तपास दिल्ली पोलीस करत आहे. दरम्यान जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर आचार्य भिक्षु हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

हेही वाचा – 

कंपनीतील स्फोटात दोन कामगार ठार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -