घरदेश-विदेशVideo: यूपीच्या व्यक्तीने आपल्या बाईकला बनवले 'Tarzan'

Video: यूपीच्या व्यक्तीने आपल्या बाईकला बनवले ‘Tarzan’

Subscribe

तुम्ही बघितली का ही गरिबांची टार्झन (Tarzan) बाईक

उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका व्यक्तीची आपली बाईक अशी तयार केली की या बाईकला ‘वंडर बाइक’ म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्याने या बाईकचे नाव ‘टार्झन’ असे ठेवले आहे. या बाईकचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होताना दिसतेय. ही बाईक मोहम्मद सईद नावाच्या वयोवृद्ध व्यक्तीची आहे. त्याच्या बाईकवर एक मिनी एटीएम मशीन असून जे बाईक मालकाच्या आवाजावर पैसे काढते.

गुरूवारी या व्हिडिओला युट्यूबवर हनी सक्सेना नावाच्या युजरने शेअर केले आहे. युट्यूबवरून हा व्हिडिओ ट्विटर, फेसबुक आणि वॉट्सअॅपवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ७० वर्षीय मोहम्मद सईद नावाचा व्यक्ती आपल्या बाईक ‘टार्झन‘ चे प्रात्याक्षिक देताना दिसतोय.

- Advertisement -

व्हिडिओ बघितला तर त्या व्यक्तीच्या आवाजावर ही बाईक सुरू होते आणि त्यातून गाणं वाजायला सुरूवात होते. तसेच त्याच्या आवाजावरून ATM मधून पैसे देते.

बघा हा ‘Tarzan’ बाईकचा व्हिडिओ

- Advertisement -

मोहम्मद सईद हे स्वतः इलेक्ट्रीशियन, स्टंट मॅन आणि सेल्स मॅन आहे. या व्हिडिओला यूट्यूबवर १७ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. या बाईकच्या क्रिएशनला बघून नेटकरी त्याचे कौतुक करत आहे.


Video: चिमुकल्या सीताचा गोंडस डान्स होतोय व्हायरल
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -