घरट्रेंडिंग७७ वर्षीय आजोबांनी चोराला हाणला; व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल

७७ वर्षीय आजोबांनी चोराला हाणला; व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल

Subscribe

सध्या सोशल मीडियात बॉक्सर आजोबांच्या बहादुरीच्या व्हिडिओची चांगलीच चर्चा सुरु आहे. आजोबांनी चोराशी दोन हात करत चोराला पळवून लावले.

सध्या ७७ वर्षीय बॉक्सर आजोबांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ब्रिटनमधील साउथ वेल्स कार्डिफ पोलिसांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक ७७ वर्षीय आजोबा कार पार्क करुन एटीएममध्ये पैसे काढायला जातात. एटीएममधून पैसे काढून आल्यानंतर अचानक एक चोर तिथे येऊन त्यांच्याकडून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, आजोबा त्या चोराशी एका बॉक्सरप्रमाणे दोन हात करतात. त्यानंतर चोर तिथून पळ काढतो.

ही घटना ५ फेब्रुवारीला कोलचेस्टर एवेन्यूमधील एका स्टोअरसमोर घडली. दरम्यान, पोलीस चोराचा शोध घेत आहेत. साउथ वेल्स कार्डिफ पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर करत चोराबाबत काही माहिती मिळाली तर पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ आत्तापर्यंत अडीच लाख लोकांनी पाहिला असून २ हजार जणांनी शेअर केला आहे. बॉक्सर आजोबांच्या या बहादुरीचं लोक कौतुक करत आहेत.

- Advertisement -

हा व्हिडिओ पाहिलात का? –

Attempt robbery in Colchester Avenue: Appeal for information

Attempt robbery in Colchester Avenue: Appeal for informationA 77-year-old man was using the cash machine outside Sainsbury’s at approximately 6am on Wednesday, February 5, when he was approached by an unknown white male demanding cash and his bank card.The victim bravely fought off the suspect who made off empty-handed towards the path leading to Colchester Avenue. Detective Constable Stephen Mayne, from South Wales Police, said: “The victim in this case showed great bravery, however he has been left shaken.“We would encourage anyone who knows him to please come forward.”The suspect was carrying a black ruck sack and was wearing a high-vis vest and black hat with a white motif on the front.Witnesses or anyone with information is asked to please contact 101 or Crimestoppers anonymously on 0800 555 111 quoting occurrence number *043939.

South Wales Police Cardiff ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 18, 2020

 अशी तस्करी बघितलीये का? तस्करीसाठी अजब शक्कल!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -