उत्तरप्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा अपघात; ८ जण ठार तर ३० जखमी

आग्रावरुन नोएडाला जाणाऱ्या प्रवासी बसचा ब्रेक फेल होऊन ती ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात ऐवढा भीषण होता की यामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे.

Uttar pradesh
bus rammed into a truck on Yamuna Expressway
यमुना एक्स्प्रेस वेवर बस आणि ट्रकला भीषण अपघात

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यमुना एक्स्प्रेसवर बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ३० जण जखमी झाले आहेत. ग्रेटर नोएडाच्या रबुपूरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घडली आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरु आहे. जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रावरुन नोएडाला जाणाऱ्या प्रवासी बसचा ब्रेक फेल होऊन ती ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात ऐवढा भीषण होता की यामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ताबडतोब नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर अपघातातील मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.