घरदेश-विदेशकाश्मीरमध्ये 'लष्कर ए तोयबा'चे ८ दहशतवादी अटक

काश्मीरमध्ये ‘लष्कर ए तोयबा’चे ८ दहशतवादी अटक

Subscribe

स्थानिक पोलिस आणि भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत शोध मोहीम सुरू

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ‘लष्कर ए तोयबा’ चे टेरर मॉड्युल उद्ध्वस्त केले आहे. लष्करच्य़ा आठ संशयित दहशतवाद्यांना अटक करून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. काश्मीरमधील गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील गुप्तचर यंत्रणेकडून काही दहशतवाद्यांना मदत करत असल्याची संबधित माहिती मिळाली होती. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत शोध मोहीम सुरू केली होती. या कारवाईत अजीज मीर, ओमर मीर, तौसीफ नजर, इमतीयाज नजर, ओमर अकबर, फैजान लतीफ, दनीश हबीब आणि शौकत अहमद मीर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

तसेच, या अटक करण्यात आलेल्या व्यक्तींजवळ काही संशयास्पद वस्तू सापडल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -