घरदेश-विदेशक्षुल्लक वादावरुन चिमुरड्याची हत्या

क्षुल्लक वादावरुन चिमुरड्याची हत्या

Subscribe

खेळण्याच्या वादातून एका ८ वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे. याप्रकरणी १० ते १२ वर्षांच्या मुलांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

खेळण्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका आठ वर्षाच्या चिमुरड्याची दुर्दैवी हत्या झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. मैदानावर खेळण्याच्या वादातून या मुलाला मारण्यात आले आणि त्यातच चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. अझीम असे या मुलाचे नाव असून या चिमुरड्याची हत्या दहा ते बारा वर्षांच्या मुलांच्या हातून घडली आहे.

नेमके काय घडले?

दक्षिण दिल्लीतील बेगमपुरा गावात मालवीय नगर जवळ एक मैदान आहे. या गावात हे एकच मैदान असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने मुल खेळण्यासाठी येत असतात. या मैदानाजवळ एका बाजूला मदरसा आहे तर दुसऱ्या बाजूला काही रहिवासी सोसायटी आहे. या परिसरात राहणारा अझीम या त्या मैदानावर खेळत होता. त्यावेळी त्या ठिकाणी १० ते १२ वर्षांच्या मुलांचा ग्रुप त्या ठिकाणी आला. या ग्रुपमधील मुलांनी अझीमला आणि त्याच्या मित्रांना मैदानावरुन जाण्यास सांगितले. यावरुन दोन ग्रुपमध्ये बाचाबाची झाली. या मुलांचा वाद इतका वाढला की, या मुलांमध्ये मारामारी झाली. या मारामारीत अझीमच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने हा चिमुरडा खाली कोससळा. अझीमला रक्तबंबाळ पाहून सर्व मुल घाबरली. या मुलांनी मदरश्यातील वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी मदरश्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. अझीमला रक्तबंबाळ पाहून त्याला लगेच खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या चिमुरड्याचा मृत्यू झाल. अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही मुलांना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -