बापरे! डॉक्टरांनी पेशंटच्या पोटातून काढल्या ८० वस्तू!

डॉक्टरांनी त्याच्या पोटातून ८० वस्तू काढल्या त्या वस्तूंचे एकूण वजन ८०० ग्राम होते.

Udaypur

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कधी काही घडेल हे सांगू शकत नाही. या अगोदर आपण मनोरुग्ण व्यक्तीने लोखंड गिळल्याच्या घटना ऐकल्या किंवा वाचल्या असतीलच. चेन्नईतील ५२ वर्षीय व्यक्तीने ३८ वस्तू गिळल्या, अहमदनगर येथील महिलेने दीड किलो लोखंड गिळले, जयपूरमधील तरुणाने ११६ खिळे गिळले आणि पुण्यातील महिलेने १७ पेन आणि २२ वस्तू गिळल्या अशा अनेक प्रकारच्या घटना या मनोरुग्ण व्यक्तींबाबत घडल्या आहेत. तरी देखील एवढं सगळं पोटात जाऊनही या व्यक्ती जगतात कशा? हा मोठाच प्रश्न आहे. अशाच प्रकारची एक घटना मनोरुग्ण व्यक्तीबाबत उदयपूर येथे घडली आहे. त्या रुग्णावर ऑपरेशन करुन डॉक्टरांनी त्याच्या पोटातून चक्क ८० वस्तू बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे.

ही व्यक्ती एक मनोरुग्ण असून त्याला पोटात दुखायला लागल्यामुळे तो उदयपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी त्याला एक्स-रे काढण्यास सांगितले. एक्स-रे मध्ये एक धक्कादायक गोष्ट कळाली. त्याच्या पोटात छोट्या मोठ्या वस्तू असल्याचे एक्स-रे मध्ये दिसले. डॉक्टरांनी रुग्णाचे ऑपरेशन केले आणि त्याच्या पोटातून तब्बल ८० वस्तू काढल्या. चाव्या, नाणी, चिलीम, सोन्याची चेन इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्याच्या पोटातून काढल्या. या सर्व वस्तूंचे एकूण वजन ८०० ग्राम होते!

आता या व्यक्तीच्या प्रकृतीचा धोका टळला असून सध्या तो सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here