घरदेश-विदेशहैदराबादमध्ये ८२५ अल्पवयीन चालकांवर गुन्हे दाखल

हैदराबादमध्ये ८२५ अल्पवयीन चालकांवर गुन्हे दाखल

Subscribe

परवानाशिवाय गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर हैदराबाद पोलिस कडक कारवाई करत आहे.

रस्त्यावरुन चालताना आपण कित्येक वेळा अल्पवयीन मुलांना गाडी चालवताना बघितले असेल. हे मुलं आपल्या आयुष्याशी खेळतातच शिवाय रस्त्याने चालणाऱ्या लोकांच्याही आयुष्याशी खेळतात. हैदराबादच्या पोलिसांनी अल्पवयीन नवशिक्या वाहन चालकांच्या विरोधात मोहिम सुरु केली. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी ८२५ खटले दाखल केले आहेत. त्याचबरोबर त्या मुलांच्या आई-वडिलांना धारेवर धरले आहे. हैदराबादच्या वाहतूक पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त अनिल कुमार यांनी सांगितले की, ‘जून महिन्यापर्यंत ८२५ वाहन मालकांविरोधात खटला दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आम्ही अल्पवयीन वाहनचालकांच्या विरोधात आमचे अभियान चालू ठेवू’.

मार्च-एप्रिल महिन्यात २६ पालकांना अटक

नियम तोडून वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांविरोधात हैदराबाद वाहतूक पोलिस खटला दाखल करत आहे. मार्च ते एप्रिल महिन्यादरम्यान पोलिसांनी २६ पालकांना अटक केले आहे. या पालकांचे मुले १८ वर्षे वयोगटापेक्षाही कमी वयाचे असून वाहन चालवत होते.

- Advertisement -

दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही बंदी

फेब्रुवारी महिन्यात याच गुन्ह्याखाली ४५ पालकांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. शिवाय, ५०० रुपयाचा दंडही आकारण्यात आला होता. त्यांच्या या कारवाईमागचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे दारु पिऊन गाडी चालवणे. हैदराबाद पोलीस दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या, परवाना किंवा इतर कागदपत्र नसणाऱ्यांवरही कडक कारवाई करत आहे.

अल्पवयीन मुलांच्या हातात देऊ नका चावी

आई-वडिल आपल्या अल्पवयीन मुलांना काहीही विचार न करता वाहनाची चावी देऊन टाकतात. कित्येक वेळा या अल्पवयीन मुलांकडून मोठे अपघातही घडतात. यामध्ये त्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न असतोच शिवाय रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्याही सुरक्षेचा प्रश्न असतो. त्यामुळे हैदराबाद पोलीसांकडून सुरु असलेल्या या मोहिमेचे कौतुक केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -