लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ८६ वर्षीय महिलेवर केला बलात्कार

आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला दिल्ली पोलिसांनी केले अटक

प्रातिनिधीक फोटो

दिल्लीतील चावला भागात एका ८६ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी पोलिसांनी ही माहिती दिली. या घटनेसंदर्भात ३७ वर्षीय आरोपी सोनू याला रेवला खानपूर येथे अटक करण्यात आली आहे. तो प्लबंरचे काम करायचा. सोमवारी सायंकाळी ही वृद्ध महिला शेजारच्या गावी जात असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला जात असताना आरोपीने महिलेला त्याच्या मोटारसायकल वरून सोडतो अशी ऑफर दिली. त्याने असेही सांगितले की, ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे सुखरूप सोडण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला एकांत ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

पोलिस उपायुक्त संतोषकुमार मीना यांनी असे सांगितले की, चावला पोलिस ठाण्यात IPC कलम ३७६ बलात्कार अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी असेही सांगितले की, महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. मंगळवारी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाने (डीसीडब्ल्यू) हे एक अत्यंत लज्जास्पद प्रकरण असल्याचे म्हटले आहे. डीसीडब्ल्यूने सांगितले की त्या महिलेच्या मते, सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती दूधवाल्याची वाट पाहत होती, तेव्हा आरोपी आला व त्याने तिला सांगितले की दूधवाला येणार नाही. त्यानंतर जेथे दूध मिळते त्याठिकाणी तिला या आरोपीने नेले. त्यानंतर त्याने महिलेला शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

महिलेची किंचाळी ऐकून स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आणि त्या आरोपीला पकडून पोलिसांना बोलावले. डीसीडब्ल्यूने सांगितले की, स्थानिकांनी महिलेच्या मुलाला आणि पोलिसांनी बोलावले नंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले.


सांगली: बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आईचाही बुडून मृत्यू