सावधान! महिला हॉस्टेलमध्ये लावले होते ९ स्पाय कॅमेरे

आरोपी संपत इंजिनीअर असून त्याने स्वत:च कॅमेरे लावण्याचे काम केले होते. त्यामुळे कोणालाही या संदर्भात माहिती नव्हती. महिला राहत असलेल्या इमारतीत तो सतत येत जात होता.

Chennai
spy_cam_chennai
घरमालक संपत याने घरी लावलेले कॅमेरे (सौजन्य- npnews)

एका महिला हॉस्टेलमध्ये तब्बल ९ स्पाय कॅमेरे लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेन्नईमधील मुराली परीसरात ही घटना घडली असून हॉस्टेलच्या बाथरुममध्ये हा कॅमेरा लावण्यात आला आहे. हे सगळे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा मुलगी बाथरुममध्ये आली त्यावेळी इलेक्ट्रिक प्लगमधून काहीतरी पडले. मुलीने ती वस्तू निरखून पाहिली असता. तो कॅमेरा असल्याचे कळले आणि तिला धक्का बसला. तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठले. घराची अधिक तपासणी केल्यानंतर एकूण ९ कॅमेरे घरी लावण्यात आल्याचे समजले. विशेष म्हणजे घराचा मालक संपत यानेच हे कॅमेरे लावल्याचे समोर आले आहे. सुदैवाने योग्यवेळी ही गोष्ट कळल्याने मोठा अनर्थ टळला.

नेमकं प्रकरण काय?

आरोपी संपत यांनी ऑक्टोबर महिन्यात घर भाड्याला देण्याची जाहिरात सोशल मीडियावर टाकली होती. मुलींसाठी ही घरे असल्याचेदेखील त्याने यात नमूद केले होते.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एका महिलेने भाड्याच्या घरासाठी संपर्क साधला आणि सहा मुलींनी दोन मजली इमारतीतील तीन घरे भाड्याने घेतली. ७हजार महिना भाडे या दराने त्यांनी या खोल्या घेतल्या. या महिला घरी राहायला येण्याआधी त्याने खोल्यांमध्ये ठिकठिकाणी कॅमेरे लावले. पण यातील एक महिला बाथरुममध्ये गेली असता. स्विचमधून काहीतरी पडले आणि तो कॅमेरा असल्याचे या महिलेला कळले. तिने थेट पोलीस स्टेशन गाठले.

रुममध्ये लावले सेन्सर कॅमेरे

रुममध्ये लावलेले कॅमेरे सेन्सर कॅमेरे होते. बाथरुममधील दरवाजा उघडल्यानंतर किंवा पाण्याचा नळ उघडल्यानंतर या कॅमेरातील रेकॉर्डिंग सुरु होणार होते. ५०० तास यात रेकॉर्डिंग करणे शक्य होते. हे कॅमेरे कपाटातील हँगर, बल्ब, स्विच, मनगटी घड्याळ, तीन बाथरुममध्ये सेट करण्यात आले होते. आवाज रेकॉर्ड करण्याची क्षमता या कॅमेऱ्यांमध्ये होती. २हजार ५०० रुपये किमतीचे हे कॅमेरे त्याने विकत घेतले होते. सुदैवाने यात कोणतेही रेकॉर्डींग होऊ शकले नाही. त्यामुळे मुलींनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

स्वत:च लावले कॅमेरे

आरोपी संपत इंजिनीअर असून त्याने स्वत:च कॅमेरे लावण्याचे काम केले होते. त्यामुळे कोणालाही या संदर्भात माहिती नव्हती. महिला राहत असलेल्या इमारतीत तो सतत येत जात होता. तो या फ्लॅटमध्ये ये- जा करत असल्याचे त्याने कबूल केले. त्याने या फ्लॅटच्या अधिक चाव्या तयार केल्या होत्या. त्याचा वापर तो ही कॅमेरे लावण्यासाठी करत होता. सध्या आरोपीला ताब्यात घेतले असून चेन्नई पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here