घरदेश-विदेशभारतात ९१ टक्के सॉफ्टवेअर पायरेटेड

भारतात ९१ टक्के सॉफ्टवेअर पायरेटेड

Subscribe

मायक्रोसॉफ्ट कंपनीने केली चाचणी. या चाचणीत काही देशांमध्ये १०० टक्के कॉम्प्युटर्समध्ये पायरेटेड सॉफ्टवेअर असल्याचे उघड झाले आहे.

भारतातील तब्बल ९१ टक्के कॉम्प्युटरमध्ये पायरेटेड सॉफ्टवेअर असल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीने उघड केले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने नऊ आशियाई देशांमधून कॉम्प्युटर विकत घेऊन ही पाहणी केली. या पाहणीमध्ये एकूण ८३ टक्के कॉम्प्युटरमध्ये पायरेटेड सॉफ्टवेअर असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये भारतातील एकूण कॉम्प्युटरपैकी ९१ टक्के कॉम्प्युटरमध्ये पायरेटेड सॉफ्टवेअर असल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा – आरोग्य विभागाचे सॉफ्टवेअर धूळखात

- Advertisement -

या देशांमध्ये १०० टक्के पायरेटेड सॉफ्टवेअर

मायक्रोसॉफ्टने केवलेल्या चाचणीत दक्षिण कोरिया, मलेशिया, व्हिएतनाम आणि थायलंड या देशांमध्ये १०० टक्के पायरेटेड सॉफ्टेवेअर असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात ९१ टक्के कम्प्युटरमध्ये पायरेटेड सॉफ्टवेअर असल्याचे आढळले. त्याखालोखाल फिलिपिन्स, तैवान, सिंगापूर आणि इंडोनेशिया या देशांचा क्रमांक लागतो. फिलिपिन्समध्ये ९४ टक्के कॉम्प्युटर बनावट आहेत. त्याचबरोबर तैवानमध्ये ७३ टक्के, सिंगापूरमध्ये ५५ टक्के आणि इंडोनेशियामध्ये ९० टक्के कॉम्प्युटरमध्ये पायरेटेड सॉफ्टवेअर आहेत.

हेही वाचा – महिला कॉन्स्टेबल निर्मित सॉफ्टवेअरचा गुन्हेगारीवर चाप

- Advertisement -

अशी झाली मायक्रोसॉफ्टची पाहणी

मायक्रोसॉफ्टने नऊ देशांमधून एकूण १६६ कॉम्प्युटर विकत घेतले. यामध्ये २२ कॉम्प्युटर भारतातील होते. त्यांपैकी २० कॉम्प्युटरमध्ये पायरेटेड सॉफ्टवेअर होते, अशी माहिती मायक्रोसॉफ्टच्या सिंगापूरमधील डिजिटल क्राइम युनिटच्या असिस्टंट जनरल कौन्सिल आणि विभागीय संचालक मेरी जो श्रेड यांनी दिली. त्याचबरोबर या पायरेटेड सॉफ्टवेअरमुळे कम्प्युटरमध्ये व्हायरसचा मोठा धोका होत असल्याचे त्या म्हणाल्या.


हेही वाचा – इंटरनेट शटडाऊन होण्यात भारत ‘नंबर १’वर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -