घरदेश-विदेश९९ वर्षीय वृद्धाने केला अल्प वयीन मुलीवर बलात्कार

९९ वर्षीय वृद्धाने केला अल्प वयीन मुलीवर बलात्कार

Subscribe

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी ९९ वर्षीय वृद्धाला चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी वृद्ध हा सेवानिवृत्त शाळेचा मुख्याद्यापक आहे. १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचारा प्रकरणी याला अटक करण्यात आली आहे. परशुराम असे या वृद्धाचे नाव आहे. परशुराम राहतो त्या परिसरात त्याच्या मालकीची १० घरे असून घरे भाडेतत्वार देऊन पैसे मिळवत होता. एका भाडेकरुच्या १० वर्षीय मुलीवरच त्याने लैगिंक अत्याचार केला असल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीचे वडील रिक्षाचालक आणि आई घरकाम करते. आपल्या पोटात खुप दुखत असल्याची तक्रार पीडित मुलीने आईकडे केली होती. उपचार केल्यानंतरही तिचे दुखने कमी होत नव्हते. तिला याबाबत अधिक विचारणा केली असता तीने आरोपी वृद्धाचे नाव सांगितले. परशुरामच्या घराभोवतीच पार्किंग शेड असून या शेडमध्ये तो पीडित मुलीला घेऊन जात होता. मात्र आरोपी वृद्धाने यापूर्वी काही मुलींवर अशाच प्रकार बलात्कार केले असल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आली.

“पीडित मुलीची आई परशुरामच्या घरातच काम करत असल्यामुळे त्याने लहान मुलीवर बलात्कार केला. परशुरामची बायको आजारी असून ती अंथरुनालाच खिळून असते. तीच्या मदतीसाठी परशुरामने पीडितेच्या आईला कामावर ठेवले होते. यापूर्वी त्याने एका नऊ वर्षीय मुलीवरही बलात्कार केला असल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आली. त्याच्या घरी भाडेतत्वावर रहायला आलेल्या एका परिवाराने त्याचे वागणे पाहून घर सोडून दिले होते. यावयात अशा प्रकारची वर्तवणूक जर हा वृद्ध करतो. आरोपी वृद्ध हा शाळेत प्राध्यापक होता.”- पोलीस निरीक्षक

- Advertisement -

परशुरामच्या मुलांना ज्यावेळी ही घटना समजली त्यावेळी त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावले होते. परशुरामला अटक केल्यानंतर त्याने बलात्काराचा आरोप फेटाळला आहे. तसेच या मुलीला तो खेळवण्यासाठी गॅरेजमध्ये घेऊन गेला असल्याचे त्याने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -