घरदेश-विदेशभारतीयांच्या एका निर्णयामुळं चीनचं निघालं दिवाळं! ४० हजार कोटींचा फटका

भारतीयांच्या एका निर्णयामुळं चीनचं निघालं दिवाळं! ४० हजार कोटींचा फटका

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि आत्मनिर्भर भारत या आवाहनाची नागरिकांनी अंमलबजावणी केली. दिवाळीच्या दिवशी खरेदी-विक्रीसाठी लोकांनी चिनी उत्पादनास विरोध केला.

कोरोनाचं संकट देशावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी Vocal For Local असे आवाहन केले असून यंदाच्या दिवाळीला स्थानिक नागरिकांकडून स्वदेशी वस्तू खरेदी करा, असे सांगितले होते. दरम्यान नागरिकांनी परदेशी वस्तूंसह चीनी वस्तू खरेदी करण्यावर बहिष्कार घातला असल्याने चीनी व्यवसायिकांना मोठा धक्का बसला आहे.  दिवाळीची खरेदी करताना नागरिकांनी चीनी वस्तूंवर चांगलाच बहिष्कार घातल्याने यंदाच्या दिवाळी चीनला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. तर व्यापार्‍यांची संघनटा असलेल्या कॅटच्या मते, दिवाळीत चीनला सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. या उत्सवाच्या हंगामात लोक चिनी उत्पादनांकडे दुर्लक्ष करताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि आत्मनिर्भर भारत या आवाहनाची नागरिकांनी अंमलबजावणी केली. दिवाळीच्या दिवशी खरेदी-विक्रीसाठी लोकांनी चिनी उत्पादनास विरोध केला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दरम्यान देशातील २० वेगवेगळ्या शहरांमधून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सुमारे ७२ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यात चीनला साधारण ४० हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले, अशी माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी भारतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी माहिती दिली.

- Advertisement -

कॅट या व्यवसाय संस्थेच्या मते, भारतात तयार केलेले अनेक उत्पादनं, ग्राहक वस्तू जसे की, विद्युत उपकरणे व इतर वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू, भेट वस्तू, मिठाई, स्नॅक्स, घरातील सामान, भांडी, सोनं व दागिने, शूज, घड्याळे, फर्निचर, कपडे, घराची सजावट मातीच्या दिव्यांसह दिवाळी पूजेच्या वस्तू, वस्तूंची विक्री चांगली झाल्याने यंदाच्या दिवाळीत चीनचं दिवाळं निघालं. त्यामुळे भारतीयांच्या एका निर्णयामुळे चीनला मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे.


पहिल्यांदाचा सेन्सेक्स ४४ हजार पार, निफ्टीत रेकॉर्ड ब्रेक वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -