गयामध्ये ऑनर किलिंग: आंतरजातीय विवाह केल्याने निर्घृण हत्या

पोलिसांनी मुलीचे वडील बालेवर यादव, काका महेश यादव आणि भाऊ श्रावण कुमार यांना अटक केली आहे. आंतरजातीय विवाह केल्याने दोघांची हत्या केली असल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.

Bihar
A couple was allegedly killed by the family
गयामध्ये ऑनर किलिंग

बिहारमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी दोघांची निर्घृण हत्या केली. ऐवढ्यावर न थांबता दोघांच्या शरीराचे तुकडे करुन ते जाळले आणि नदीत फेकू दिले. बिहारच्या गयामधील मनियारा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी मुलीचे वडील बालेवर यादव, काका महेश यादव आणि भाऊ श्रावण कुमार यांना अटक केली आहे.

अशी घडली घटना

गयाच्या वजीरंगज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या कारीसोवा गावातील रहिवासी विकास बुध्दगेरे हा तरुण गेल्या पाच वर्षापासून कोचिंग क्लास चालवत होता. १० वीमध्ये शिकणारी सोनी यादव त्याच्या क्लासमध्ये शिकत होती. ती मनियार गावच्या बालेश्वर यादव याची मुलगी होती. विकास आणि सोनी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. दीड महिन्यापूर्वी दोघे जण घरातून फरार झाले आणि त्यांनी एका मंदिरामध्ये लग्न केले. एका आठवड्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. विकासला तुरुंगात पाठवण्यात आले तर सोनीला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

आंतरजातीय विवाहाला विरोध

काही दिवसांपूर्वी विकासला जामीन मिळाला. त्यानंतर पुन्हा दोघांचे एकमेकांशी फोनवरुन बोलणे सुरु झाले. सोनीने विकासला भेटण्यासाठी बोलावले. गावाजवळील पुलाजवळ विकासला सोनीच्या कुटुंबियांनी पकडे आणि त्याला बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. हत्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन ते नदीच्या काठावरील जमीनत गाढण्यात आले. सोनीला विकासची हत्या झाल्याची माहिती मिळाली. तिने कुटुंबियांना यासंदर्भात विचारणा केली. विकास जिवंत असल्याचे सांगून तिच्या कुटुंबियांनी तिला देखील नदीच्या किनारी घेऊन आले. त्याठिकाणी तिची हत्या करुन तिचा मृतदेह जाळला.

गुन्ह्याची दिली कबुली

विकासचे वडील चांदो पासवान यांनी ८ फेब्रुवारीला मुफस्सिल पोलीस ठाण्यात विकासच्या अपहणाची तक्रार दाखल केली. याचा तपास करण्यासाठी पोलीस मनियार गावात पोहचले. पोलिसांनी सोनीच्या कुटुंबियांची चौकशी करण्यास सुरुवात केली असता. तिचे वडील, काका आणि तिच्या भावाने हत्या केल्याची कबूली दिली. सोनी कुमारी आणि विकास कुमार यांनी आंतरजातीय विवाह केल्याने तिच्या कुटुंबियांनी दोघांची निर्घृण हत्या केली असल्याचे डीएसपी अभिजीत कुमार सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा – 

मध्य प्रदेशमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार; बापानेच मुलीला जाळले!

मालेगावात ऑनर किलिंग; पोटच्या मुलीचा दाबला गळा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here