घरदेश-विदेशकेरळमध्ये १९१ प्रवासी असलेले विमान रनवेवरून दरीत कोसळले

केरळमध्ये १९१ प्रवासी असलेले विमान रनवेवरून दरीत कोसळले

Subscribe

विमानाचे दोन तुकडे, दोन्ही पायलट ठार

केरळमध्ये कोझिकोड विमानतळावर दुबईहून आलेले एअर इंडियाचे विमान लॅण्डिंग करताना धावपट्टीवरुन घसरून दरीत कोसळले. त्यामुळे झालेल्या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले असून रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचा पायलट आणि को-पायलट या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. विमानात क्रू मेंबर्ससह १९१ प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले होते.

एअर इंडियाचे IX1344 क्रमांकाचे विमान दुबईहून कोझिकोडा विमानतळावर आले. हे विमान संध्याकाळी ७.४१ वाजता लॅण्डिंग करताना रनवेवरून घसरून दरीत कोसळले. त्यामुळे विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले. या अपघातात विमानाचा पायलट आणि सह-पायलट हे दोघे ठार झाल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

विमानात एकूण १९१ जण होते. त्यापैकी ६ क्रू मेंबर्स, दोन पायलट आणि १० लहान मुले होती. हे विमान लॅण्डिंग होताना मुसळधार पाऊस कोसळत होता. तसेच दृश्यमानता २००० मीटर इतकीच होती. मुसळधार पावसामुळे हे विमान रनवेवरून घसल्याचे सांगितले जाते. घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले होते.

सुदैवाने विमानाला आग लागलेली नाही, त्यामुळे बचाव कार्याला वेग आला आहे. जखमींना नजिकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हे विमान वंदे भारत अभियानांतर्गत परदेशातून भारतीयांना आणणारे विमान होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -