घरदेश-विदेशप्यार किया तो डरना क्या; त्यांच्या वयात ४० वर्षांचे अंतर

प्यार किया तो डरना क्या; त्यांच्या वयात ४० वर्षांचे अंतर

Subscribe

सायमनची उंची अवघी पाच फूट आहे. एडनापेक्षाही कमी, पण खऱ्या प्रेमींना त्याचे काय? ते तर एकमेकांच्या प्रेमाच्या खोलीत आकंठ बुडालेले असतात सायमन आणि एडनाप्रमाणे...

सायमन आणि एडना हे दोघे पतीपत्नी मागील काही वर्षांपासून आपल्या संसारात ‘नांदा सौख्य भरे’ चा पाठ गिरवित आहेत. खरे तर त्यांच्यातील अंतर ४० वर्षांचे सायमन ४४, तर एडना मार्टीन ही ८३ वर्षांची. म्हणजे जवळपास त्याच्या आजीच्या वयाची, पण तरीही त्यांच्या पती पत्नीच्या नात्यात त्याने काहीही फरक पडलेला नाही. त्यांचे एकमेकांवरील प्रेम अजूनही उत्कट आणि ताजे आहे. हे अनोखे जोडपे ब्रिटनमधील वेस्टनसुपरमरे गावात राहत आहे.

सायमन हा उत्कृष्ट ऑर्गन वादक आहे. त्याच्या ऑर्गनवादनाच्या कौशल्यामुळे पंचक्रोशीत तो ओळखला जातो, तर दोन मुलग्यांची आई आणि चार नातवंडांची आजी झालेली एडना सिव्हील इंजिनियर होती. ऑर्गनची तिलाही आवड आहे. त्यामुळे दोघांचेही हेच ऑर्गनप्रेम त्यांच्या एकत्र येण्याचे कारण ठरले, ऑर्गनवादनाच्या एका कार्यक्रमस्थळी दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले आणि त्यांना ‘पाहताक्षणी प्रेम’ जडले. प्रेमात पडलेला प्रत्येक जोडप्याचे जसे पुढे होते तसेच त्यांचेही झाले, म्हणजेच एकमेकांशी फोनवरून तासंतास बोलणे, एकमेकांना प्रेमपत्र लिहिणे वगैरे अगदी साग्रसंगीत प्रेम त्यांनी केले.

- Advertisement -
फोटो सौजन्य : मेट्रो युके

आमच्या लग्नाला आता १४ वर्षे झाली आहेत. मात्र आमचे प्रेम अजूनही तितकेच ताजे आहे. वेस्टनमध्येच एका ऑर्गन इव्हेंटमध्ये आम्ही भेटलो. या कार्यक्रमासाठी सायमन आला तेव्हा कार्यक्रम जवळजवळ सुरू झाला होता. म्हणून मग त्याला मागच्य दाराने म्हणजेच यावे लागले. तेव्हा दरवाजात मीच उभी होते. मी काळ्या रंगाचा सुट घातला होता. मी त्याला पाहिले आणि पाहतच राहिले. पाहताक्षणी मला तो आवडला होता आणि त्यालाही मी आवडले होते,’ एडना आपली प्रेमकहाणी सांगते. पुढे हे त्यांचे प्रेम फुलले आणि एक दिवस त्यांनी रितसर लग्नही केले. तत्पूर्वी या ज्या ऑर्गन वादनाच्या कंसर्टमध्ये ते पहिल्यांदा भेटले, त्याच संध्याकाळी त्यांनी एकमेकांना चुंबन देऊन आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

आपल्या ऑर्गनवादना कार्यक्रमामुळे सायमन देशभर दौरे करायचा. मात्र त्याला मधुमेह झाला आणि नंतर त्याच्यावर मूत्रपिंडरोपणाची शस्त्रक्रियाही करावी लागली त्यामुळे त्याचे बाहेरगावचे दौरे बंद झाले. असे असले तरी तो अजूनही ऑर्गन वाजवतो. असा एकही दिवस गेला नाही की त्याने आपली पत्नी इडनसाठी ऑर्गन वाजवला नाही, रोज रात्री तो तिच्यासाठी ‘गुडनाईट, स्वीट हार्ट’ अशी गाणी ऑर्गनवर वाजवतो.

- Advertisement -
फोटो सौजन्य : मेट्रो युके

कोणत्याही तरुण जोडप्यांप्रमाणेच आमचे नाते आहे, आम्ही फिरायला जातो, मध्येच रस्त्यात थांबून चुंबन घेतो, कधी कधी एकमेकांच्या खोड्याही काढतो. मी सायमनला रस्त्यात चिमटे काढून चिडवतेहीइतकेच काय आम्ही सेक्सचाही आनंद घेतो,’ एडना सांगते. या दोघांनी लग्न केले तेव्हा त्यांच्यावर टिकाही झाली. या थेरडीला म्हातारचळ सुटलाय आणि तिने मग एक ‘टॉयबॉय’ सायमनच्या रूपाने आणलाय असेही काही लोक म्हणत. पण त्यांच्या नात्यात त्यामुळे काहीच फरक पडला नसल्याचे सायमन सांगतो.

सायमनला डिस्लेक्सिया आहे. त्यामुळे त्याला वाचताना अडचणी येतात. तसेच आजारामुळे त्याला बोलताना आणि अन्य हालचालींनाही मर्यादा येतात. तर वयोमानामुळे एडना आता थकली आहे. तिला चालताना त्रास होतो. पण तरीही या गोष्टींचा अडथळा त्यांच्या नात्यात येत नाही. ‘म्हातारपणामुळे हे होणारच आहे, तुम्ही कधी कुणाला तरुण होताना पाहिलंय का?’ एडना दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर असा प्रश्न विचारते.

एडनाला आपल्या पहिल्या लग्नापासून झालेले दोन मुलगे आहेत. लोरेन आणि रसेल. दोघेही अनुक्रमे ५९ आणि ५७ वर्षांचे आहेत. त्या दोघांनाही आपली आई आणि सावत्र वडील सायमनच्या नात्याबद्दल आदर वाटतो. ते नेहमीच त्यांच्या नात्याला पाठींबा देतात. इतकेच काय तर फादर्स डे’ च्या दिवशी दोघांनीही आपल्यापेक्षा वयाने २० वर्षांनी लहान असणाऱ्या बापाला, म्हणजेच सायमनला भेट कार्ड दिले होते आणि लटक्या हट्टाने ‘डॅड, डॅड म्हणून त्याचे पायही ओढले होते..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -