घरदेश-विदेशआधारमुळे ९० हजार कोटींची बचत

आधारमुळे ९० हजार कोटींची बचत

Subscribe

यूआयडीएआयचे अध्यक्ष जे. सत्यनारायण यांनी दिलेल्या माहितीवरुन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्न व सार्वजनिक वितरण, ग्रामीण विकास आणि इतर विभागांनी ९० हजार कोटींची बचत केली.

आधार कार्डामुळे देशातील ९० हजार कोटींची बचत झाल्याची माहिती यूआयडीएआयचे अध्यक्ष जे. सत्यनारयण यांनी दिली आहे. विविध सरकारी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारी वरुन ही माहिती देण्यात आली. सरासरी तीन कोटी नागरिक आपल्या आधारकार्डाचा नियमीत वापर करतात. शिधावाटप पत्रिका, पेन्शन, ग्रामीण रोजगार आणि शिष्यवृत्ती यासाठी प्रामुख्याने आधारकार्डाचा वापर होतो. डिजिटल आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (आयएसबी) व्दारे या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. बचत झालेल्या पैशाचा वापर शासकिय योजनांमध्ये करण्यात येणार आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्न व सार्वजनिक वितरण, ग्रामीण विकास आणि इतर विभागाकडून हे पैसे वाचवण्यात आले आहे. तंत्रज्ञानात विकास होत असली तरीही काही भागात विकास होणे आवश्यक आहेत. डिजिटल आयडेंटीटी रिसर्च इनिशिव्हने (डीआयआरआय) केलेले संशोधनाला सादर करणे हे या परिषदेचे मुख्य उद्धीष्ट होते. डीआयआरआय ने आधारकार्ड आणि डिजिटल सेवांचा अभ्यास करुन यावेळी आपली माहिती सादर केली. या परिषदेला १५० संशोधकांनी भाग घेतला होता.

- Advertisement -

“अधिक कार्यक्षम बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम तयार करण्यासाठी आपल्याला अधिक संशोधनाची गरज आहे. आधार इको-सिस्टमची सुरक्षा, नोंदणी प्रक्रिया आणि अपडेटिंगसाठी अधिक कार्यक्षम तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आपण कृत्रिम बुद्धीमता वापरून या क्षेत्रामध्ये अधिक कार्यक्षम बनू शकतो” – यूआयडीएआयचे अध्यक्ष जे. सत्यनारयण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -