घरताज्या घडामोडीकेजरीवालांचा आमदार फुटला, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

केजरीवालांचा आमदार फुटला, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

Subscribe

दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे आमदार फतेह सिंह आणि कमांडो सुरिंदर सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे आमदार फतेह सिंह आणि कमांडो सुरिंदर सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. या दोघांचेही स्वागत करताना ‘दिल्ली अभी दूर नहीं…’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’ हा पक्ष आदरणीय पवार साहेबांनी दिलेला एक विचार आहे आणि या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण पक्षाशी जोडले जात आहेत, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले जयंत पाटील?

‘विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार यांचा करीश्मा चांगलाच गाजला होता. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मिळून ३०-३५ जागांची मजल मारेल, अशी चर्चा होत असताना शरद पवार यांनी झंझावात दौरा करत पक्षाचे ५४ आमदार निवडून आणले. इतकेच नव्हे तर राज्यात महाविकासआघाडीचे सरकारही स्थापन झाले. महाराष्ट्राच्या पाठोपाठ झारखंड राज्याच्या निवडणुका झाल्या तिथल्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील या विजयाचे श्रेय खासदार पवार यांना दिले आहे. पवार यांच्याकडून प्रेरित होऊनच आपण निवडणूक लढलो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


हेही वाचा – ‘राज्यात दिल्लीसारखी स्थिती होऊ देणार नाही’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -