‘राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध’! निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप

निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महंत धर्मदास यांनी गुरुवारी गृहमंत्रालयाला एक नोटीस बजावली

निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महंत धर्मदास यांनी गुरुवारी गृहमंत्रालयाला एक नोटीस बजावली आहे. राम मंदिर ट्रस्टची निर्मिती सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेली नाही, ती अवैध असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच या ट्रस्टची निर्मिती आणि नियंत्रण असावे, अशी मागणीही महंत धर्मदास यांनी केली आहे.

राम मंदिरची स्थापना अवैध असल्याचा आरोप

निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी राम मंदिर ट्रस्टची स्थापना अवैध असल्याचा आरोप केला आहे. राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध, मनमानी पद्धतीने करण्यात आली आहे, असा आरोप करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरुद्ध असल्याचे महंत धर्मदास यांनी नोटीसमध्ये म्हटल आहे. या प्रकरणी लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कायदेशीर कारवाईची मागणी करु, असा इशाराही देण्यात आला आहे.

संपत्ती हडपण्यासाठी या ट्रस्टची निर्मिती

राम मंदिर ट्रस्टची निर्मिती सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि संत समाजाच्या इच्छेनुसार झालेली नाही. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी आणि संपत्ती हडपण्यासाठी या ट्रस्टची निर्मिती झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याविषयी बोलताना आपल्याला या ट्रस्टमध्ये का घेण्यात आलं नाही? असाही प्रश्न विचारला.

असे म्हटले नोटीसमध्ये…

जे लोक या प्रकरणात १९४९ पासून सुनावणी करत होते, त्यांना ट्रस्टमध्ये सहभागी करुन घेण्यात आले नाही. पण जे लोक १९८९ नंतर त्यात सहभागी झाले त्यांना ट्रस्टमध्ये घेण्यात आलं. कारण, त्यांचा मोठ्या राजकीय व्यक्तींशी संबंध आहे, असाही आरोप महंत धर्मदास यांनी केला आहे. तर गुरु बाबा अभिराम दास हे १९४९ पासून रामललाचे पुजारी होते. त्यांच्या परिवारातील कुणालाही ट्रस्टमध्ये स्थान देण्यात आलं नाही, असं नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे. अनुसूचित जातीतील सदस्याला ट्रस्टी बनवून हिंदूंमध्ये दरी निर्माण करण्याचं काम सातत्यानं झाल्याचा आरोप मंहत धर्मदास यांनी केला आहे.


‘मी मुख्यमंत्री पदावर दावा केलाच नाही’, नितीश कुमार यांच्या दाव्याने खळबळ