घरदेश-विदेश'या' सिनेमाची कथा, अभिनंदन यांच्याशी मिळती-जुळती

‘या’ सिनेमाची कथा, अभिनंदन यांच्याशी मिळती-जुळती

Subscribe

अभिनंदनचे यांचे वडील एस. वर्धमान यांनी दक्षिणात्‍य चित्रपट दिग्‍दर्शक मणिरत्नम यांना एका चित्रपटाच्‍या निर्मितीसाठी मदत केली होती.

भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सुखरुप भारतात परतावे यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. अभिनंदन यांच्या काकांनी ‘आमच्या मुलाला सुखरुप परत आणा’ अशी सरकराला विनंती केली आहे. तर दुसरीकडे, ‘मला माझ्या मुलाचा अभिमान आहे आणि तो नक्की परतेल याची मला खात्री आहे’, अशा अर्थाचे भावूक पत्र लिहीले आहे. दरम्यान, या प्रकरणाशी निगडीत एक वेगळा पैलू सध्या चांगलाच चर्चिला जात आहे. अभिनंदन यांच्या सद्य परिस्थितीला एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या कथेशी जोडलं जात आहे. अभिनंदनचे यांचे वडील एस. वर्धमान यांनी दक्षिणात्‍य चित्रपट दिग्‍दर्शक मणिरत्नम यांना एका चित्रपटाच्‍या निर्मितीसाठी मदत केली होती. याच चित्रपटाची कथा आपल्या मुलाच्या आयुष्यातही घडेल, असं त्यांना स्वप्नातही कधी वाटलं नसेल.

‘तो’ चित्रपट कोणता?

अभिनंदन यांच्‍या वडिलांनी मदत केलेल्या ‘कातरु वेलियिदाई’ या दाक्षिणात्य चित्रपटाची कथा अभिनंदन यांच्‍या आयुष्‍यात खरीखुरी घडली असल्याची चर्चा केली जात आहे. कातरु वेलियिदाई हा मणिरत्नम यांचा चित्रपट २०१७ ला रिलीज झाला होता. या चित्रपटात एअर फोर्स लीडर वरुण चक्रपाणी १९९९ च्‍या कारगील युद्धाच्‍या दरम्‍यान पाकिस्तानात घुसतात. यावेळी त्यांचे फायटर प्लेन रावळपिंडीमध्ये क्रॅश होते आणि चक्रपाणी पाकिस्तानी आर्मी ताब्‍यात सापडतात. त्यानंतर पाकिस्तानी आर्मी त्यांना युद्ध कैदी बनवून टॉर्चर करतात. पाकिस्तानच्‍या ताब्‍यात असताना ते कशाप्रकारे आपल्या कुटुंबियांच्या आणि देशाच्या आठवणीत अनेक हालअपेष्टा सोसतात, हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. तमिळ सुपरस्‍टार कार्थी आणि अभिनेत्री अदिति राव हैदरी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्‍या आहेत. या चित्रपाटाच्या निर्मितीसाठी अभिनंदन वर्धमानचे वडील एअर मार्शल एस. वर्धमान यांनी मणिरत्नम यांना साहाय्य केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -