घरट्रेंडिंगयंदा दिवाळीत चिनी वस्तूंच्या विक्रीत ६० टक्क्यांनी घट

यंदा दिवाळीत चिनी वस्तूंच्या विक्रीत ६० टक्क्यांनी घट

Subscribe

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटने यासंदर्भात सर्वेक्षण अहवाल सादर

दिवाळीच्या दरम्यान बाजारपेठेतील चिनी वस्तूंची किंमत कमी असल्याने ग्राहक आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात चिनी वस्तूंची खरेदी करतात. दिवाळी दरम्यान चिनी वस्तूंची मागणी अधिक असल्याने त्या वस्तूंची विक्री देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र यंदा दिवाळीत चिनी वस्तूंच्या सामानाची विक्री ६० टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटने यासंदर्भात सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे.

गेल्या वर्षी ८ हजार करोड रूपयांची विक्री

या अहवालानुसार या दिवाळीमध्ये चिनी वस्तूंची विक्री साधारण ३ हजार २०० करोड रूपयांची झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, गेल्या वर्षी दिवाळी दरम्यान ८ हजार करोड रूपयांच्या चिनी वस्तूंची विक्री झाली होती. या चिनी वस्तूंच्या विक्रीत घट झालेल्या यादीमध्ये गिफ्ट, गॅजेट, फॅन्सी लाईट, भांडी, गृहपयोगी साहित्य, प्लास्टिक सामान, देवी-देवतांच्या मूर्त्या, सजावटी सामान, खेळणे, इलेक्ट्रॉनिक सामान, होम फर्निशिंग सामान, फुटवेअर आणि कपडे इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

- Advertisement -

ग्राहकांच्या मानसिकतेत बदल

सर्वेक्षण केलेल्या ८५ टक्के व्यापाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेमुळे या दिवाळी चिनी वस्तू तसेच उत्पादनांची विक्री कमी होऊन त्या वस्तूंच्या विक्रीत घट झाली आहे. मात्र, सर्वेक्षण केलेल्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने सांगितले की, ‘ चिनी वस्तूंची किंमत कमी जरी असली तरी या वस्तू अधिक टिकाऊ नसतात, हे ग्राहकांना पटल्याने चिनी वस्तूंच्या विक्रीमध्ये घट झाली आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -