घरदेश-विदेशपॅरेंट - चाईल्ड थेरपीनं तणावग्रस्त मुलांना होईल मदत

पॅरेंट – चाईल्ड थेरपीनं तणावग्रस्त मुलांना होईल मदत

Subscribe

मुलांमधील नैराश्य लवकरात लवकर ओळखून त्यांना या तणावातून बाहेर काढण्याचा पालकांनी प्रयत्न करायला हवा. त्यांच्या भावना ओळखून त्यांना योग्य तऱ्हेनं मार्गदर्शन पालक करू शकतात. पॅरेंट - चाईल्ड थेरपीचा करता येतो उपयोग.

आजकाल बघावं तिथं तणावामुळं आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झाल्याचं ऐकिवात येत आहे. द वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसननं केलेल्या रिसर्चनुसार, या तणावापासून मुक्त होण्यासाठी तरूण मुलांना पॅरेंट – चाईल्ड थेरपी मदत करू शकते असं सिद्ध झालं आहे. करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, ही थेरपी पालक आणि त्यांच्या निराश मुलांना संवेदनक्षम करून त्यांच्यातील तणाव दूर करण्यास मदत करते आणि मुलांमध्ये असणाऱ्या तणावांच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यासदेखील मदत करते.

पालकांनी नक्की काय करावं?

मुलांमधील नैराश्य लवकरात लवकर ओळखून त्यांना या तणावातून बाहेर काढण्याचा पालकांनी प्रयत्न करायला हवा. त्यांच्या भावना ओळखून त्यांना योग्य तऱ्हेनं मार्गदर्शन पालक करू शकतात. उदासीनता अथवा नैराश्याचा मार्ग बदलता येऊ शकतो असा आमचा विश्वास असून नंतर आयुष्यात सतत घडणाऱ्या घडामोडींना सामोरं जाता येतं, असं मत मुख्य संशोधक जॉन लुबीनं व्यक्त केलं आहे. याचा अभ्यास करत असताना तणावग्रस्त परिस्थितीमध्ये मुलांच्या भावनांना कसा प्रतिसाद द्यायचा याचं प्रशिक्षण युनिव्हर्सिटीत देण्यात आल्याचं लुबीनं एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं. विशेष म्हणजे, आपल्या मुलांबरोबर काम केलेल्या पालकांमुळं निराश असणाऱ्या मुलांमधील लक्षणं सुधारताना अभ्यासातून समोर आलं आहे. या पॅरेंट – चाईल्ड थेरपीकरिता मानसोपचारतज्ज्ञांची आवश्यकता नाही तर मास्टर – डिग्री पातळीवरील चिकित्सकांद्वारेदेखील ही थेरपी करण्यात येऊ शकते असं लुबी यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

द अमेरिकन जर्नल ऑफ सायकॅट्रीमध्ये हे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. तणावग्रस्त मुलांसाठी ही थेरपी करून वेळेवर त्यांना यातून बाहेर काढता आल्यास, पुढील संभाव्य धोके टळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -