‘नातीने आजीचे नाक कापले’; परेश रावल यांचा प्रियांका गांधींना ट्विटरवरून टोमणा

New Delhi

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना केंद्र सरकारने दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटिस बजावल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे माजी खासदार, अभिनेते परेश रावल यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘फुकटच्या बंगल्यात राहून नातीने आजीचं (इंदिरा गांधी) नाक कापलं आहे,’ असं परेश रावल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस केंद्र सरकारने बजावली आहे. बंगला खाली करण्यासाठी त्यांना १ ऑगस्ट २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीनंतरही सरकारी बंगल्यात राहिल्यास भाडे किंवा दंड भरावा लागेल, असेही सांगण्यात आले आहे. एसपीजी सुरक्षा हटवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे कारण या नोटिसमध्ये देण्यात आले आहे.

हेही वाचा –

घर मालकिनीच्या अस्थी पाहून पाळीव कुत्र्याने उंचावरून मारली उडी!