घरदेश-विदेशढाई किलो का हाथ कमल के साथ; सनी पाजीची भाजपमध्ये एन्ट्री

ढाई किलो का हाथ कमल के साथ; सनी पाजीची भाजपमध्ये एन्ट्री

Subscribe

सनी देओल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काहि दिवसांपासून रंगल्या होत्या. अखेर आज सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात भाजपचे वरिष्ठ नेते पियूष गोयल आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांच्या उपस्थितीमध्ये सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सनी देओल लोकसभा निवडणूक लढवणार आहे. पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपकडून त्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

धर्मेद्र-हेमा मालिनीनंतर आता सनी देओलने देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सनी देओल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. अखेर आज सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी सनी देओल आणि अमित शहा यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावरुन सनी भाजपमध्ये प्रवेश करणार  असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूर या लोकसभा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुदासपूर या लोकसभा मतदार संघातून भाजपचे नेते आणि अभिनेते विनोद खन्ना हे चार वेळा खासदार राहिले होते. २०१७ मध्ये विनोद खन्ना यांच्या निधनानंतर हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. २०१७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे सुनील जाखर हे विजयी झाले.

- Advertisement -

सनी देओलचे वडील अभिनेता धर्मेंद्र आणि आई हेमा मालिनी हे आधीपासून राजकारणात आहेत. भाजपच्या तिकीटावर २००४ मध्ये धर्मेंद्र यांनी राजस्थानच्या बिकानेर येथे निवडणूक लढवली होती आणि ते विजयी देखील झाले होते. त्यानंतर हेमा मालिनी यांनी मथुरा येथे भाजपकडून निवडणूक लढली. सध्या त्या भाजपच्या खासदार आहेत. ६२ वर्षाचे सनी देओल आजही चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. मागच्या वर्षी त्यांचा ‘यमला पगला दिवाना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘मेहल्ला अस्सी’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -