घरदेश-विदेशBudget 2019 : '२०१९ चा अर्थसंल्प नव्या बाटलीत जुनी दारु भरल्यासारखा'

Budget 2019 : ‘२०१९ चा अर्थसंल्प नव्या बाटलीत जुनी दारु भरल्यासारखा’

Subscribe

'२०१९ च्या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या योजनेची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु भरल्यासारखा आहे', असे खासदार अधीर रंजन चोधरी म्हणाले आहेत.

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेचे सदस्य आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ‘२०१९ चा अर्थसंकल्प म्हणजे नव्या बाटलितील जुनी दारु असा आहे’, अशा शब्दांमध्ये त्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

काय म्हणाले अधीर रंजन चौधरी?

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार अधीर रंजन चोधरी म्हणाले की, ‘या अर्थसंकल्पात काहीच नवीन असे नाही आहे. जुन्याच आश्वासनांची घोषणा करण्यात आली आहे. ते नव्या भारतची गोष्ट करत आहेत. मात्र अर्थसंकल्प हा नव्या बाटलीत जुनी दारु भरल्यासारखा आहे. कुठलीच नवी बाब यात नाही. रोजगारासाठी कुठलीच योजना नाही. कोणत्याही प्रकारची नवी शुरुवात नाही.’ चौधरींसोबतच इतर विरोधकांनी देखील रोजगाराच्या मुद्यावरुन अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Budget 2019 : भारत सरकार गरिबांसाठी कोट्यवधी घरे बांधणार

हेही वाचा – Budget 2019 : महिला आणि विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात ‘या’ तरतूदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -