घरदेश-विदेशऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीने रचना इतिहास

ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीने रचना इतिहास

Subscribe

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट खेळाडू एलिसे पेरीने विश्वविक्रम केला आहे.

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट खेळाडू एलिसे पेरीने विश्वविक्रम केला आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरी जवळपास चार वर्षांनंतर बाद झाली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिलांच्या अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पेरी बाद झाली असून इंग्लंडच्या लौरा मार्शने तिला ११६ धावानंतर आऊट केले आहे.

- Advertisement -

एका सामन्यात दोन विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरी २०१५ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये खेळली होती. त्यामध्ये ती १३ धावा करुन आऊट झाली होती. त्यानंतर आज म्हणजे ३ वर्ष ११ महिने आणि ६ दिवसांनंतर तिला बाद करण्यात इंग्लंडला यश आले आहे. तिने या कालावधीत ६५५ चेंडूंचा सामना करताना ३२९ धावा केल्या आहेत. तर इंगलंडविरुद्धच्याच यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या तिने २१३ धावा केल्या होत्या. तर सलग दोन कसोटीत शतक झळकवणारी ऑस्ट्रेलियाची एलिसे पेरी ही पहिली महिला क्रिकेट पटू ठरली आहे.

- Advertisement -

आज पुन्हा तिने शतक केले

ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी चार वर्षांत तिसरा कसोटी सामना खेळला. तिने २०१५ मध्ये ११ ऑगस्टला इंग्लंविरुद्ध १३ धावा केल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये तिने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावताना नाबाद २१३ धावा केल्या आणि इंग्लंडविरुद्धच आज तिने पुन्हा शतकी खेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -