घरदेश-विदेशद्रमुकमध्ये देखील 'भाऊबंदकी' उफाळली!!

द्रमुकमध्ये देखील ‘भाऊबंदकी’ उफाळली!!

Subscribe

करूणानिधी यांच्या निधानानंतर दोन्ही मुलांमधील वाद टोकाला पोहोचला आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पक्षाच्या मिटींगनंतर पुढील बाबी स्पष्ट होतील.

‘भाऊबंदकी’ हा शब्दच सारं काही सांगून जातो. अशी कोणतीही गोष्ट नसेल ज्या ठिकाणी आपल्याला ‘भाऊबंदकी’ पाहायाला मिळत नाही. राजकारणात तर भाऊबंदकी कुणालाच ऐकत नाही. महाराष्ट्रातील भाऊबंदकी तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. आता याच भाऊबंदकीमुळे तामिळनाडूमध्ये देखील वाद उफाळून आला आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे सर्वेसर्वा एम. करूनानिधी यांच्या मृत्यूला आठवडा अद्याप आठवडा देखील झाला नाही. तोच करूणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. करूणानिधींचा मोठा मुलगा एम. अळगिरी यांनी करुणानिधींचे खरे वारसदार असल्याचा दावा केला आहे. तर, धाकटा मुलगा स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. एम. स्टॅलिन, एम. अळगिरी आणि कनिमोळी ही करूणानिधींची ३ मुले. पण, स्टॅलिन आणि अळगिरी या दोघांमधील वादामुळे काही वर्षांपूर्वी अळगिरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तर त्याचवेळी स्टॅलिन यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. या दोघांचा वाद इतका टोकाला गेला की, २०११ आणि २०१६ साली तामिळनाडून विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. पण, अळगिरी यांना पक्षातून बाहेर काढल्यानंतर मात्र हा वाद शांत झाला. अळगिरी हे बराच काळ राजकारणापासून लांब होते.

वाचा – करुणानिधी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी

दोन भावांमध्ये वाद

करूणानिधींच्या निधनानंतर एम. अळगिरी पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झाले. मरीना बीचवर जाऊन त्यांनी करूणानिधींच्या समाधीचे देखील दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी द्रमुकच्या बहुतांश कार्यकर्त्यांचा मला पाठिंबा आहे. करूणानिधींचा खरा वारसदार मीच. एम. स्टॅलिनला पक्षाध्यक्ष होण्याचा अधिकारच नाही. अशा शब्दात त्यांनी एम. स्टॅलिन यांचं आव्हान दिलं आहे. तामिळनाडूत ठिकठिकाणी अळगिरीचे समर्थन करणारे पोस्टर्स लावले गेले आहेत. तसेच त्यांना पक्षात परत घ्या अशी मागणी देखील जोर धरत आहे. सोशल मीडियावर देखील अळगिरी यांच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे स्टॅलिन यांनी अळगिरी यांचे सर्व दावे फेटाळले आहेत. त्यामुळे द्रमकमध्ये दोन गट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी एमजीआर आणि करुणानिधीमध्ये असेच वाद झाले होते. परिणामी, वाद विकोपाला गेल्याने द्रमुक पक्ष फुटला होता. याच घडामोडींच्या पार्श्वभूमिवर मंगळवारी पक्षाने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये पक्षाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे स्टॅलिन- अळगिरीमधील वादाचे पुढे काय होते? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. तामिळनाडूच्या राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड आहे.

वाचा – करुणानिधी आणि जयललिता यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -