घरदेश-विदेशएक्झिट पोलनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी

एक्झिट पोलनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी

Subscribe

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड तेजी आली आहे. रुपयाने ७३ पैशांनी उसंडी मारत प्रगती केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर शेअर मार्केटमध्ये कमालीची तेजी बघायला मिळत आहे. रविवारी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्यानंतर संध्याकाळी सर्वच वृत्तवाहिनीवर एक्झिट पोलची चर्चा सुरु झाली. या एक्झिट पोलच्या माहितीनुसार एनडीएला सर्वाधिक जागा मिळण्याचे संकेत आहेत. या एक्झिट पोलनंतर सोमवारी सकाळी शेअर मार्केटमध्ये सेंसेक्स आणि निफ्टीने उसंडी मारली आहे.


सेंसक्समध्ये ९०० रुपयांची वाढ झाली आहे. तर निफ्टीमध्ये २०० रुपयांची तेजी आली आहे. यासोबतच रुपया देखील मजबूत झाला आहे. रुपयाची किंमत ७३ पैशांनी वाढली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी रुपयाची किंमत ६९.४३ रुपये प्रतिडॉलर ऐवढी झाली आहे. सेंसेक्स ८८८.९१ अंकासोबत ३८,८१९.६८ अंकावर पोहोचला आहे, तर निफ्टी २८४.१५ अंकासोबत ११६९१.३० अंकावर येऊन पोहचले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -