Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग एक बार ठान ली मतलब ठान ली! पठ्ठ्यानं १५७ वेळा दिली ड्रायव्हींग...

एक बार ठान ली मतलब ठान ली! पठ्ठ्यानं १५७ वेळा दिली ड्रायव्हींग टेस्ट

Related Story

- Advertisement -

आजकालच्या युगात गाडी असणं खूप महत्त्वाचं झालं आहे. मात्र, त्यासाठी गाडी चालवता येणं देखील महत्त्वाचं आहे. गाडी चालवता येत असेल तर गाडी घेऊन आपल्या कामासाठी जाता येतं. कमी वेळात कामं होतात. पण गाडी चालवता येणं जेवढ महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे वाहन परवाना. परवाना नसेल तर दंडनिय अपराध ठरतो. त्यामुळे वाहन परवाना मिळवल्यानंतरच गाडी चालवणं योग्य आहे. वाहन परवाना मिळवण्यासाठी काही मोठी कसरत करावी लागत नाहीत. वाहन परवाना मिळवण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते त्यानंतर गाडी चालवण्याचा ट्रायल होतो. पण ही टेस्ट देताना जर नापास झालात तर पुन्हा पुन्हा टेस्ट द्यावी लागते. अनेकांनी दोन-तीन वेळा टेस्ट दिली असेल पण एका पठ्ठ्यानं वाहन परवान्यासाठी चक्क १५७ वेळा टेस्ट दिली आहे. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. ही व्यक्ती ब्रिटनमधील आहे. या व्यक्तीने तब्बल १५७ वेळा ड्रायव्हींग टेस्ट दिल्यानंतर त्याला वाहन परवाना मिळाला आहे.

ड्रायव्हींग टेस्ट देताना अनेकजण नापास झाले असतील. १०-१५ वेळा नापास झालेले असतील. पण एका पठ्ठ्यानं १५७ वेळा ड्रायव्हींग टेस्ट दिली. अखेर १५८ व्या वेळी टेस्ट देत तो वाहन परवाना घेण्यात यशस्वी झाला आहे. ब्रिटनमधील या व्यक्तीने हार न मानता सातत्याने प्रयत्न करत अखेर वाहन परवाना मिळवला. ब्रिटनमधील या व्यक्तीने आपलं नाव जाहीर न करु नका असं सांगितलं आहे. दरम्यान, १५८ वेळा ड्रायव्हींग टेस्ट दिली तर त्याची फी देखील द्यावी लागणार. या व्यक्तीला तीन लाख रुपये एवढे खर्च आला आहे. यावर मार्क टाँग (Mark Tongue) जे सिलेक्ट काल लिसिंगचे प्रमुख आहेत, त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही घटना खरी असल्याचं सांगितलं.

- Advertisement -

अनेकवेळा टेस्ट देऊन वाहन परवाना मिळवणारा हा काही पहिला व्यक्ती नाही. याआधी देखील असे पराक्रम केले आहेत. ड्रायव्हींग अँड व्हेईकल स्टँडर्ड्स एजन्सीद्वारे जारी केलेल्या आकडेवारीत इंग्लंडमधील एका महिलेने ११७ वेळा ड्रायव्हींग टेस्ट दिली आहे. मात्र, अद्याप तिला ही टेस्ट पास करता आला नाही.

 

- Advertisement -