बायकोच्या भांडणात नवऱ्याने घेतला मुलांचा जीव

पत्नीने नांदायला नकार दिल्याने रागाच्या भरात पतीने दोन्ही मुलांना खोल दरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली आहे.

Mumbai
after fight with wife husbund hurls two kids down a 300 ft gorge
बायकोच्या भांडणात नवऱ्याने घेतला मुलांचा जीव

पत्नीने नांदायला नकार दिल्याने रागाच्या भरात पतीने दोन्ही मुलांना खोल दरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडल्याचे समोर आले आहे. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी घडल्याचे समोर आले असून याप्रकरणी आरोपी सरंजिवीला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

तामिळनाडूत राहणारे सरंजिवी आपल्या पत्नीसोबत आनंदाने संसार करत होते. मात्र, त्यांच्यात सतत काहींना काही कारणांवरुन भांडण सुरु होती. गेल्या सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यात पुन्हा एकदा घरगुती भांडण झाले होते. या भांडणानंतर सरंजिवीची पत्तीनी बाक्कीयमने आपल्या मुलांना घेऊन माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या मुलांसोबत कोल्ली हिल्स येथे आई – वडिलांच्या घरी राहत होती. दरम्यान, सरंजिवी हा ८ ऑक्टोबरला तामिळनाडूत नामाक्कलमध्ये कोल्ली हिल्स येथे गेला होता. त्यावेळी सरंजिवी आणि बाक्कीयम त्यांच्यात पुन्हा वाद झाला. दरम्यान, सरंजिवीच्या पत्नीने त्याच्यासोबत नांदायला नकार दिला. आपली पत्नी नांदण्यास तयार नसल्याने सरंजिवीने संतापाच्या भरात गिरीदास (८) आणि कविदर्क्षिनी (५) या दोन्ही मुलांना ३०० फूट खोल दरीत फेकून दिले असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – हरयाणातील १० मंत्र्यांनी घेतली पदाची शपथ