घरदेश-विदेशकेरळात आता 'या' नव्या संकटाची भिती?

केरळात आता ‘या’ नव्या संकटाची भिती?

Subscribe

केरळमधील पूर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी जमीन सुकून गेली आहे. याचा परिणाम गांडुळांवर झाला आहे. केरळमधील वयांड आणि इडूकी जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला आहे.

ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाने केरळला चांगलेच झोडपून काढले. पूराने येथील जनजीवन या पावसाने विस्कळीत झाले. महिनाभर पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर येथील पूराचे पाणी ओसरले खरे, पण आता केरळपुढे नवे संकट उभे ठाकले आहे. मातीला पोषक अशा गांडुळांची संख्या कमी होत आहे. कोझीकोडे येथील शेतकऱ्यांने त्याच्या शेतातील मेलेले गांडुळ पाहून याची सूचना केरळ सरकाराला दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.

यामुळे मरत आहेत गांडुळं

केरळमधील पूर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी जमीन सुकून गेली आहे. याचा परिणाम गांडुळांवर झाला आहे. केरळमधील वयांड आणि इडूकी जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला आहे. येथे कित्येक हजार गांडुळ मेलेले आढळून आले. केरळमधील जमिनीचा विचार करता या ठिकाणची माती अधिक सुपीक आहे. येथील गांडुळामुळे येथील जमीन अधिक सुपीक आहे. पण गेल्या काही वर्षांपासून केरळमध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केरळचे तापमानही बदलले आहे. याचा परिणाम गांडुळावर होत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

- Advertisement -

गांडुळांसाठी पोषक तापमान

गांडुळासाठी १५ ते २८ डिग्री इतकं तापमान अनुकूल असते. पण सध्या केरळातील तापमान बदलत असल्यामुळे त्याचा परिणाम गांडुळासाठी पोषक तापमान फार कमी ठिकाणी राहिले आहे. विशेषत: वयांड आणि इडुकीमध्ये हे तापमान बदलले आहे.

काय होऊ शकतो परिणाम?

केरळमध्ये भात, कॉफी, मसाल्यांची पिके अधिक आहेत. येथील विशिष्ठ गांडुळांमुळे माती भुसभुशीत आणि सुपीक होते. जर गांडुळांची संख्या कमी झाली तर जमिनीतील पोषकतत्वे कमी होतील आणि त्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे.

kerala_ganpati
केरळमधील पूरपरिस्थिती (सौजन्य- सोशल मीडिया)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -