घरटेक-वेकशेवटच्या तासातील विक्रीनंतरही तेजी कायम

शेवटच्या तासातील विक्रीनंतरही तेजी कायम

Subscribe

नव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी वाढ होणार असे वाटत असताना झालेल्या विक्रीमुळे दोघांमध्येही घसरण झाली. मात्र तरीही शनिवारच्या तुलनेत सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत बंद झाले. सोमवारी सकाळी कामकाजाच्या सुरुवातीला बाजारात चांगली खरेदी झाली होती.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक, सेन्सेक्समध्ये १५५ अंकांची (०.४३ टक्के) वाढ होऊन तो ३५,८५० अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीत ४९ अंकांची (०.४६ टक्के) वाढ होऊन तो १०,७७६.६० अंकांवर स्थिरावला. मध्यम कंपन्या आणि लहान कंपन्यांच्या निर्देशांकात जुजबी वाढ दिसून आली.

- Advertisement -

निफ्टीतील ५० कंपन्यांपैकी एक्सिस बँक आणि भारती इंफ्राटेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली. त्यानंतर टाटा मोटर्स, टायटन कंपनी, ग्रासिम, मारुती सुझुकी, ओएनजीसी, एनटीपीसी आणि टीसीएस कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्याचे दिसून आले.

तर दुसरीकडे इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या शेअर्सच्या किमतीत ५ टक्क्यांची मोठी घसरण झाली. त्याशिवाय बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज लॅब्स, यस बँक, आयशर मोटर्स, हिंडाल्को, हिरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, बजाज फायनान्स आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांचे शेअर घसरले.

- Advertisement -

मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स, टाटा स्टिल, यस बँक, वेदांता लिमिटेड या कंंपन्यांचे शेअर्स वधारले. तर बजाज ऑटो आणि कोटक बँकेच्या समभागांच्या किमतीत घसरण झाल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -